ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

शुक्रवार, 17 अक्टूबर 2025

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी पकडला ट्रॅक्टर नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांची रात्रीला धाडसी कारवाई.

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी पकडला ट्रॅक्टर नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांची रात्रीला धाडसी कारवाई.


सारखनी/ रशीद फाजलानी 

माहूर तालुक्याला उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेले किरण भोंडवे यांनी ईवळेश्वर रस्त्यावर अवैधरित्या कुठलीही परवानगी नसताना ट्रॅक्टर मध्ये वाळू भरून नेत असताना रात्रीला पाठलाग करून ट्रॅक्टर पकडत पोलीस ठाण्यात आणून जप्त केल्याची धाडसी कारवाईची घटना दि 16 रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडल्याने वाळू तस्करात खळबळ उडाली आहे.

पावसाळा संपण्याआधीच वाळू तस्करांनी नांल्या वर काढून नदी नाले ओढ्यातून वाळू तस्करी सुरू केल्याची चर्चा होत असतानाच नव्याने रुजू झालेले तरुण तडफदार उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांना माहिती मिळाल्याने वानोळा परिसरात वस्तीवर असताना कुपटी ते इवळेश्वर रस्त्यावर एक ट्रॅक्टर लाईट बंद करून जातानाचा आवाज आल्याने त्यांनी त्याचा पाठलाग केला इवळेश्वर जवळ त्यास अडवून तपासणी केली असता ट्रॅक्टर क्रमांक एम एच 29 बी व्ही 4115 आढळून आला त्यामध्ये वाळू भरून दिसल्याने त्यांनी सोबतच्या पोलिसांना त्यास माहूर पोलीस स्टेशनमध्ये आणण्याचे सांगून पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कार्यवाहीत उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांचे सह पो.उप.नी. शरद घोडके स.पो.उप.नी. पालसिंग ब्राह्मण पोका अवधूत कावडे नवनाथ कोरडे परमेश्वर मामीलवाड दत्तात्रय सोनटक्के यांचे सह पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांनी आल्या आल्याच लपून-छपून सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर प्रहार करणे सुरू करून वाळू तस्करांनाही दणका दिल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांचे अभिनंदन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें