ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

शुक्रवार, 21 अगस्त 2026

वायफनी येथे अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी, याप्रसंगी पिंटू आशीर्वाद पाटील यांनी मार्गदर्शन केले.

वायफनी येथे अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी, याप्रसंगी पिंटू आशीर्वाद पाटील यांनी मार्गदर्शन केले.


सारखणी प्रतिनिधी/ रशीद फाजलानी 

माहूर तालुक्यातील वायफनी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी वायफनीचे सुपुत्र तथा शिवसेना एक जिल्हा परिषद गटाचे प्रबळ दावेदार पिंटू आशीर्वाद पाटील वायफनीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर गावकऱ्यांशी संवाद साधताना पिंटू आशीर्वाद पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. अण्णाभाऊ साठे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला घडविले आणि आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांना दिशा देण्याचे महान कार्य केले, असे त्यांनी सांगितले.

“अण्णाभाऊ साठे यांनी केवळ साहित्य निर्माण केले नाही, तर समाज घडविण्याचे काम केले. त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन आजच्या पिढीने शिक्षण, संघटन आणि सामाजिक जाणीव यांना महत्त्व देणे गरजेचे आहे,” असे विचार पिंटू आशीर्वाद पाटील यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास गावातील ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नामदेव जाधव, किशोर पाटील, प्रकाश बंडेवार, दशरथ बंडेवार, बंडू सूर्यवंशी, तुळशीराम तळेवाड, सुरेश अंकुरवाड, मानिका आंबटवार यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन तिरुपती मेटकर व दिगंबरराव बोयवारे यांनी केले. उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या विचारांना उजाळा दिला.

अण्णाभाऊंचा विचार जपूया, समाज घडवूया आणि पुढील पिढीला शिक्षण व संघर्षाची प्रेरणा देऊया, असा संदेश या जयंती सोहळ्यातून देण्यात आला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें