दृश्य विचलित करणारे आहेत 18 वर्षाच्या वरील व्यक्तींनी ही बातमी बघावी
सारखणी मांडवी रोडवर दहेलीजवळ भीषण अपघात दोघे ठार ऐकाची प्रकृती चिंताजनक.
गावानजीक काळाने घातला झडप दहेली गावावर शोकाकूळ वातावरण.
सारखणी प्रतिनिधी / रशीद फाजलानी
सारखणी मांडवी रोडवर दहेली गावानजीक तीन वाजता च्या दरम्यान एका वळणावर बुलेट गाडीवर जाणाऱ्या तिघा विद्यार्थ्यांचा भीषण अपघात झाला असून दोघे ठार तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की बारावीची परीक्षा देऊन अंजनखेड, माहूर वरून दहेली आपल्या गावा कडे जात असताना दहेली गावा नाजीकच्या वळणावर दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने प्रतिक लेंडे, कृष्णा बोंतावार, गणेश तोटावार, या विद्यार्थ्यांचा बाभळीच्या झाडावर बुलेट गाडी धडकल्याने तिघेही गंभीर जखमी झाले. वेळीच दहेली गावचे सरपंच राकेश तोटावर यांनी वाहन करून प्राथमिक विलाज करण्यासाठी दैली तांडा येथे या तिघांनाही दाखल केले. तेथून प्राथमिक विलाज करून ॲम्बुलन्स च्या साह्याने यवतमाळ येथे हलवण्यात आले यवतमाळ येथील क्रिटीकेअरच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने प्रतिक लेंडे, कृष्णा बोंतावार यांना मृत घोषित केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तरीपण घरच्या लोकांनी अद्याप पर्यंत याला दुजोरा दिला नाही. तर गणेश तोटावर या विद्यार्थ्याच्या पायाला जबर मार लागल्याची माहिती समोर येत आहे. अगदी गावाजवळ येऊन हा भीषण अपघात झाल्याने दहेली गावावर शोकाकुल वातावरण पसरले आहे. तर कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दहेली गावानजीकच्या वळणावर आज पर्यंत अनेक अपघात झाले असून या रस्त्यावर अपघात प्रवण स्थळ असे दर्शवणारे एकही फलक नसून या वळणावर दोन्ही दिशेने गतिरोधक टाकण्याची मांगणी दहेली येथील सरपंच राकेश तोटावर यांनी मराठवाडा न्यूज च्या माध्यमातून केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देईल का असा प्रश्न याप्रसंगी उपस्थित होत आहे.
https://youtu.be/eGbaqoSuQTM?si=Re3nQ2mtjg7VCtup




सही बात है
जवाब देंहटाएंसरखणी से लेकर
मांडवी तक, या फिर आदिलाबाद तक कोई दिशा दर्शक फलक नही
लगाये. जो भी डिपार्टमेंट जिम्मेदार हो
जलद काम करना चाहिए
Haa
हटाएंRip
जवाब देंहटाएंईसका जिमेदार प्रसासन जिमे दार है
जवाब देंहटाएंफलक लगाना चाहिये
जवाब देंहटाएंदिशा दर्शक फलक, गती रोधक जरुरी
जवाब देंहटाएंrip
जवाब देंहटाएंAjay jaiswal
जवाब देंहटाएं