ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

सोमवार, 26 फ़रवरी 2024

ग्रामपंचायत कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन


ग्रामपंचायत कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन 

किनवट : ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र भर दि. 26/02/2024 ते 29/02/2024 रोजी ग्रामपंचायत कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. 

     ग्रामपंचायत कर्मचा-यांंना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचा-या प्रमाणे वेतन श्रेणी मंजुर करणे,  ग्रामपंचायत कर्मच-यांना निवृत्त वेतन लागू करणे.,  ग्रामपंचायत कर्मचा-यांना वेतन अनुदानासाठी लागलेली वसुलीची अट पूर्णतः रद्द करणे,  माहे ऑगष्ट 2020 ते मार्च 2022 पयर्ंतचा थकित वेतन तात्काळ अदा करणे, भविष्य निर्वाह निधीची रक्कम व राहिनीमान भत्ताची रक्कम अदा करणे व शासन निर्णयानुसार तसेच परिमंडळ 1,2,3 प्रमाणे लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत मध्ये नवीन पद भरती सेवा जेष्ठतेनुसार करण्यात यावी. या मागण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना तालुका शाखा किनवट च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दि. 26/02/2024 ते 29/02/2024 पयर्ंत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे.

किनवट तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी काम बंद आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. निवेदनाच्या प्रति गटविकास अधिकारी, पंचायत समिती, किनवट यांचे सह जिल्हाधिकारी नांदेड, मुख्यकार्यकारी आधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) जि.प. नांदेड, जि.प. नांदेड,  पोलिस निरीक्षक किनवट यांना देण्यात आले आहे. दि.26 रोजी दुपारी.01 वाजता तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचा-यांंनी पंचायत समिती किनवट येथे उपस्थित राहून काम बंद आंदोलन सु‘वात करायची आहे. तसेच सरपंच, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक यांनी या काम बंद आंदोलनाला पाठिंबा देऊन सहकार्य करण्याचे आवाहन ग्राम पंचायत संघटनेचे तालुका अध्यक्ष संजीव वानखेडे यांनी केले आहे.




कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें