प्रतिनीधी / रशीद फाजलाणी
दि. ११ / फेब्रुवारी २०२४ रोजी मराठवाडा न्युजने सारखणी येथील 5 MVA विध्युत रोहीञ कधीही पडु शकतों बंद.सारखणी विध्युत वितरण कंपणीच्या कार्यालयावरील विस गावे राहु शकतात अंधारात.? या आशयाची बातमी प्रकाशीत केली होती,या बातमीची मा.एस.बी.जाधव साहेब, अधिक्षक अभियंता नांदेड, मा.आर.बि.चौधरी कार्यकारी अभियंता साहेब भोकर, मा.इंद्रणील गोरले साहेब,उप कार्यकारी अभियंता किनवट, यांच्या सह मा.सुमीत दडमल,सहाय्यक अभियंता शाखा कार्यालय सारखणी या वरिष्ठ अधीकार्यांनी गांर्भियाने दख्खल घेतली व दिनांक २१ / फेब्रुवारी २०२४ रोजी नांदेड येथील वरिष्ठ तंञज्ञाची एक टिम मोठे वाहन घेवुन सारखनीत दाखल झाले व सारखणी या जंगशन वर असलेल्या विध्युत वितरण कंपणीच्या कार्यालय येवुन सन १९८४ मध्ये स्थापना केलेल्या व १९९७ मध्ये 5 MVA विध्युत रोहीञ (ट्रान्स फार्मर) बसवण्यात आलेल्या ट्रान्स फार्मरची चाचपनी केली व तब्बल २७ वर्षे पुर्ण झालेल्या ट्रान्स फार्मरचे जंकाटलेले ऑईल काढुन नविन ऑईल टाकण्यात आले या कामा साठी आलेल्या वरिष्ठ अधीकार्याने मराठावाडा न्युज शी बोलतांना सांगीतले कि आपन वेळे वर या रोहीत्राची सर्वीसींग केल्याने या रोहीत्राला जिवदान मिळाले आहे. माञ सारखणी येथील विजेचा दाब पाहता सारखणी या विध्युत वितरण विभागाला अजुन एक 5 MVA विध्युत रोहीञ बसवण्याची आवश्क्ता असल्या बाबत त्यांनी प्रतिक्रीया दिली.
तसेच सारखणी हे गांव दहेली फिडरशी सलग्न असल्याने दहेली फिडर वरील दहेली, दहेली तांडा, बामनगुडा, भगवती आदी गावाला किमान २४ ते २५ किलो मिटरची लाईन गेलेली आहे. त्या २५ किलो मिटर मध्ये काही तांञीक बिगाड झाल्यास त्याचा फटका सारखणी वाशीयांना ना, हक ञास सहन करावा लागतो,व तासन तास विध्युत पुरवठा बंद असतो याची सुद्धा विध्युत विभागाने गांर्भियाने दख्खल घेवुन. वेगळी लाईन टाकण्याचे काम दुर्दगतीवर असुन येत्या आठवड्यात सारखणीचा विषेश फिडर काडुन लाईन सुरु करनार असल्याची माहीती सुमीत दडमल,सहाय्यक अभियंता शाखा कार्यालय सारखणी यांनी दिली आहे, यावेळी सारखणी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयातील सर्वच कर्मचारी ,ऑपरेटर उपस्थित होते.
तसेच मराठवाडा न्युजची गांर्भियाने दख्खल घेतल्याने सारखणी व परिसरातील ग्रामस्थांनी मराठवाडा न्युजला शुभेच्छा दिल्या आहेत.....



कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें