ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

रविवार, 11 फ़रवरी 2024

सारखणी येथील 5 MVA विध्‍युत रोहीञ कधीही पडु शकतों बंद.सारखणी विध्‍युत वितरण कंपणीच्‍या कार्यालयावरील विस गावे राहु शकतात अंधारात.?

सारखणी येथील 5 MVA विध्‍युत रोहीञ कधीही पडु शकतों बंद.सारखणी विध्‍युत वितरण कंपणीच्‍या कार्यालयावरील विस गावे राहु शकतात अंधारात.?

प्रतिनीधी / रशीद फाजलानी

नांदेड जिल्‍याचा आदीवासी बहुल भाग म्‍हणुण परिचीत असलेल्‍या किनवट तालुक्‍यातील सारखणी या जंगशन वर एक विध्‍युत वितरण कंपणीचा कार्यालय असुन या कार्यालयाची स्‍थापना सन १९८४ मध्‍ये झाली असुन, आता सध्या स्थितीमध्ये सारखनी वितरण कार्यालय येथे 5 MVA विध्‍युत रोहीञ हे १९९७ मध्‍ये  (ट्रान्‍स फार्मर) बसवण्‍यात आले असुन या ट्रान्‍सफार्मरला बसवुन किमान २७ वर्षे पुर्ण झाली असुन या ट्रान्‍स फार्मरचे सुरळीत चालण्‍याची गॅरंटी, वारंटी हे २५ वर्षे असतें त्‍याला किमान २७ वर्षे झाल्‍याने २० गावांना रोशनाई मध्‍ये ठेवणारा रोहीञ कधीही बंद पडुन सारखणी विध्‍युत वितरण कंपणीचा कार्यालय अंधारमय होवु शकतों यात काहीच शंका नाही.

सारखणी या बाजार पेठेचा ईतीहास पाहीला असता जवळच्‍या पन्‍नास गावाचा सर्पंक हा सारखणी शी असुन सर्वात जास्‍त विध्‍युत विभागाला सारखणी मधुनच उत्‍पन्‍न होतो, परंतु सारखणी हे गांव दहेली फिडरशी सलग्‍न असल्‍याने दहेली फिडर वरील दहेली, दहेली तांडा, बामनगुडा, भगवती आदी गावाला किमान २४ ते २५ किलो मिटरची लाईन गेलेली आहे. त्‍या २५ किलो मिटर मध्‍ये काही तांञीक बिगाड झाल्‍यास त्‍याचा फटका सारखणी वाशीयांना, नाहक ञास सहन करावा लागतो, व तासन तास विध्‍युत पुरवठा बंद असतो म्‍हणुन सारखणी या गावासाठी व्‍यक्‍तीक फिडर, स्‍ पेशल विज वाहीणी द्वारे पुरवठा द्यावा अशी मांगणी जोर धरु लागली आहे.

सद्या शेतात हरभरा, गहु,  ज्‍वार, तुरी आदी पिके असुन या साठी थ्री फेज लाईन चि आवशक्‍ता असते, शेतासाठी लाईन चालु केली कि माञ घर संसारोपयोगी फ्रिज, पानी मोटार, पंखे, आदी हे चालत नाही घरातील लाईनचा होल्‍टेज हा १०० ते १२५ पर्यंत येतो या मुळे घरातील अनेक उपकरणात बिघाड येत असुन ना दुरुस्‍त होत आहे. याचा फटका ग्रामस्‍थांना सहन करावा लागत आहे. उन्‍हाळ्याची चाहुल लागत आहे या मध्‍ये विजेचा वापर अधीक होतो कमी दर्जाचा विज पुरवठा होत असल्‍याने विजग्राहकांना त्‍याचा फटका बसनार आहे, या भागात किरकोळ पाऊस,वारा,आला कि माञ ५ ते ६ तास विध्‍युत पुरवठा खंडीत होतो हे माञ कडु सत्‍य आहे.  

म्‍हणुन सारखणी येथील 5 MVA विध्‍युत रोहीञ (ट्रान्‍स फार्मर) बदलुन जास्‍त दरज्‍याचा रोहीञ द्यावा या साठी लवकरच सारखणी निवासी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्‍याची चेतावणी दिली आहे. या कडे किनवट, भोकर व नांदेड येथील वरिष्‍ठ अधीकारी लक्ष देतील कि वातानुकुलीत कार्यालयात बसुन सारखणी निवासी व या कार्यालयावर असलेल्‍या विस गावांतील जनता आधारमय झाल्‍या नंतर याकडे लक्षदेतील हे माञ येनाण काळच ठरवणार आहे....






कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें