ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

सोमवार, 5 फ़रवरी 2024

सारखणी जिल्हा परिषद शाळेत आनंद मेळावा संपन्न


सारखणी जिल्हा परिषद शाळेत आनंद मेळावा संपन्न

विद्यार्थ्यांनी थाटली खाद्य पदार्थाची दुकाने

सारखणी प्रतिनिधी / रशीद फाजलानी 

दि.5  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने दिनांक 5 फेब्रुवारी रोजी बाल विद्यार्थी किलबिल आनंद बाजार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसायिक ज्ञान मिळावे शालेय बाल चिमुकल्यांचा आनंद दि‌गुणित व्हावा या उद्देशाने मेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते सारखणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील मुलांच्या गुणवत्ता च्या पाया मजबूत करण्यासाठी पालकांनी व मान्यवरांच्या पसंतीची ठरले आहे यावेळी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर सुंदर शाळा अंतर्गत प्रशालीत आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित मान्यवरांनी विविध खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला विद्यार्थ्याचे कौतुक केले शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी विविध संधी मिळेल तिथे आपल्यातील सूक्त गुण प्रगट करावीत व एक जागरूक नागरिक होण्यासाठी शालेय जीवनापासून प्रयत्न करावे असे आव्हान शिक्षण विस्तार अधिकारी अनिल महामुने यांनी केले याप्रसंगी केंद्रप्रमुख पवार सरपंच सूर्यभान सिडाम उपसरपंच श्रीमती शेवंताबाई जाधव कुंडलिक राठोड शाळा समितीचे अध्यक्ष संजय पवार पत्रकार त्रिंबक पुनवटकर रशीद फाजलानी जावेद चाऊस सचिन जाधव मिलिंद कांबळे सुभाष कोहाड ब्रह्मा हनवते निलेश चव्हाण दत्ता राऊत शंकर महाराज माजी सरपंच वनमाला रमेश तोडसाम सुनिता तोडसाम अशोक जाधव क्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल मुख्याध्यापक सुनील भास्करवार शिक्षक पुनाराम जाधव कांबळे सर प्रकाश मडावी सर उमरे सर आधी शिक्षकेतर आधी सर्वांचे भरभरून कौतुक केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुनाराम जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन कळंबे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक भास्करवार यांनी मांडले कार्यक्रमांच्या यशस्वी साठी सर्व शिक्षक शिक्षकेतर यांनी विशेष परिश्रम घेतले या प्रसंगी पालक नागरिकांनी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला....

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें