ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

सोमवार, 29 जनवरी 2024

अभिवक्ता संघाकडून राहुरी घटनेचा निषेध


 अभिवक्ता संघाकडून राहुरी घटनेचा निषेध 

प्रतिनिधी रशीद फाजलानी

किनवट,दि.२९: अहमदनगर जिल्हात राहुरी तालुक्यातील न्यायालयात काम करणारे अँड. राजाराम आढाव व अँड मनिषा आढाव यांचा दि. २५ जानेवारी रोजी खंडणीसाठी अपहरण करुन निर्घृण  खुन करण्यात आला अशा प्रवृत्तीचा जाहीर निषेध म्हणून आज (दि.२९) न्यायालयीन कामकाजात वकिलांनी सहभाग नोंदविला नाही.
    यासंदर्भाने एक निवेदनही दिवाणी न्यायाधिश यांना देण्यात आले.निवेदनात नमुद केले आहे की, अहमदनगर जिल्हात राहुरी तालुक्यातील न्यायालयात काम करणारे अँड. राजाराम जयवंतराव आढाव व अँड. मनिषा राजाराम आढाव या दाम्पत्याचा खंडणीसाठी अपहरण करुन निर्घृण खुन करण्यात आला आहे. अशा अमानवी कृत्याचा व प्रवृत्तीचा जाहीर निषेध म्हणून आज रोजीच्या न्यायालयीन कामकाजात सहभाग न देता सर्व वकील सदस्यंहे अर्ज देऊन प्रकरण वाढवून घेत आहोत.निवेदनावर अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अँड. आर. डी. सोनकांबळे, उपाध्यक्ष अँड. श्रीकृष्णा मो. राठोडसचिव अँड. एस. पी. शिरपुरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें