सारखणी येथील फाजलानी प्रोव्हिजन अँड किराणा मध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कार्यवाही पाच टाक्या केल्या सील ? तर अनेक खाध्य प्रदार्थ केले जप्त ?.
सारखणी प्रतिनिधी
नांदेड जिल्याच्या किनवट तालुक्यातील मोठी बाजार पेठ म्हणुन परिचीत असलेल्या सारखणी येथील फाजालानी किराणा अँड प्रोव्हिजन मध्ये अन्न व औषध प्रशासनाने धडक कार्यवाही करत पाच टाक्या खाद्य तेल तर अनेक प्रकारचे खाध्य पदार्थ जप्त केल्याने किनवट माहुर तालुक्यात एकच खळ बळ निर्माण झाली आहे विषेश बाब म्हन्जे हि किराना दुकान फाजलानी कुटुंबाची सर्वात जुनी किराना दुकान म्हणुन परिचीत आहे..
या बाबत सविस्तर वृत्त असे कि दिनांक ०५/०७/२०२४ रोज शुक्रवार नेहमी प्रमाने सारखणी येथील फाजलानी प्रोव्हिजन अँड किराणा हि सकाळी ०९ ते १० वाजताच्या दरम्यान उघडली आणी दुकान उघडताच सकाळी १० ते ११ वाजताच्या दरम्यान MH 10 CX 9455 ह्या पांडर्या रंगाच्या कार मधुन तिन व्यक्ती सरळ किराना दुकान मध्ये प्रवेश करुन आपन अन्न व औषध प्रशासनाचे अधीकारी असल्याचे परिचय देत तब्बल दोन तासा पेक्षा अधीक काळ दुकानात राहुन बारकाईने चौकशी केली या चौकशीत अन्न व औषध प्रशासनाचे अधीकारी खुला बाहेर ठेवलेल्या गोड तेलाच्या टाक्या मधुन नमुने घेतले असुन पाच गोड तेलाच्या टाक्यांना सिल केल्याचे चर्चिला जात असुन विविध प्रकारचे खाद्य सामग्री सुद्धा जप्त केल्याचे खाञी लायक वृत्त आहे.
या किराना दुकानचे चालक फैसल हारुन फाजलानी तर कधुन मधुन समद हारुन फाजलानी हे दुकान चालवतात फाजलानी प्रोव्हिजन अँड किराणा या दुकान मध्ये उच्च दर्जाच्या खाध्य सामग्रीचे पैसे घेतले जातात तर निकृष्ठ दर्जाचे खाध्य पर्दाथ विकले जातात या आदीवासी बहुल भागातील जनतेच्या जिवनाशी खेळण्याचे काम संबधीत दुकान मालक करत असल्याची तक्रार थेट राज्याचे मुख्यमंञी एकनाथ शींदे,यांना निवेदना द्वारे केल्याची चर्चा वतुळात एैकावयास मिळत आहे.
सदर प्रकरणात कुठलीही कार्यवाही होवु नये म्हणुन साम,दाम,दंड,भेद सह राजकीय पुढार्यांच्या दुरध्वनीचा सुद्धा वापर केल्याची चर्चा सारखणीत आहे. माञ जनतेच्या जिवनाचा खेळ करणार्रयांना धडा शिकवण्यासाठी वरिष्ठांनी कंबर कसली असुन या प्रकरणात लवकरच कायदेशीर प्रक्रीया पार पाडुन गुन्हा दाखल करुन प्रकरण न्याय प्रविष्ठ होणार असल्याचे बोलले जात आहे.
या गंभीर प्रकरणात अन्न सुरक्षा अधीकारी यांनी कमालीची गोपनीयता बाळगुन असुन सर्व काही वरिष्ठांच्या मार्गदशना खाली होत असुन दोषींची गय केली जानार नसल्याचे नांदेड येथील अन्न सुरक्षा अधीकारी व औषध प्रशासन विभागाचे अधीकारी सतीष हाके,रु.र.मरेवार यांनी स्पष्ठ केले आहे.या कार्यवाही मुळे भेसळ करणार्यांचे धाबे दनानले असुन गोड तेलाच्या टांक्यांनासिल करण्याची या भगातील बहुदा हि पहीलीच कार्यवाही मानली जात आहे.सदर प्रकरणात कोनत्या प्रकारची कार्यवाही केली जानार या कडे या आदीवासी बहुल जनतेचे लक्ष लागुन आहे व या घडक कार्यवाहीने जनते मधुन समाधान व्यक्त केला जात आहे हे माञ तेवढेच खरे.



कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें