ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

शुक्रवार, 21 अगस्त 2026

सिंदखेड पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात कारवाई: ₹7,40,700/- लाखांचा प्रतिबंधित गुटखा व वाहन जप्त. दोन आरोपी जेर बंद...

सिंदखेड पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात कारवाई: ₹7,40,700/- लाखांचा प्रतिबंधित गुटखा व वाहन जप्त. दोन आरोपी जेर बंद...


सारखणी प्रतिनिधी, रशीद फाजलानी 

नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत सिंदखेड पोलीस ठाण्याच्या पथकाने प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत गुन्हा दाखल केले आहे. तर या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे, या कारवाईत एकूण ₹7,40,700/- किंमतीचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहण जप्त करण्यात आले असून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की दि. 20 ऑगस्ट 2026 रोजी पोलीस स्टेशन सिंडखेड येथील पोलीस अधिकारी संतोष जोंधळे व त्यांचे पथक अवैध धंद्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईसाठी गस्त घालत असताना प्रभारी अधिकारी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौ सारखणी वनोउपज तपासणी नाका, रोडवर अवैध गुटखा वाहनातूक वाहतूक करीत आहे.या बाबत माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन संबंधित वाहन अडवून त्याची तपासणी केली. तपासणीदरम्यान पोलिसांनी संशयित कार वाहन (MH-29 CR-0155) ची तपासणी केली. तपासणी दरम्यान वाहनात पोत्यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. त्यामध्ये विविध कंपनीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू किंमत 1,40,700/- व एक कार (MH-29 CR-0155) अंदाजे किंमत 6,00,000/- रुपये असा एकुण ₹7,40,7000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाईदरम्यान आरोपी नामे 1. प्रफुल भालचंद्र येन्नावार, वय 38 वर्षे रा. लक्ष्मीनगर पुसद, 2. निवृती धर्माजी अल्लडवार, वय 49 वर्षे रा सुभाष वार्ड पुसद जि यवतमाळ याचे ताब्यातुन वरील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध सिंदखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 93/2026 कलम 123, 247, 275 बीएनएस सह कलम 26, 27, 30(2) (अ) 59 अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड,व उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे, पोलीस अंमलदार आकाश सावंत, कदम, वानखेडे व होमगार्ड सर्व नेमणुक सिंदखेड पोलीस स्टेशन यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, सुगंधित तंबाखू किंवा तत्सम अन्नपदार्थांचा साठा, विक्री अथवा वाहतूक होत असल्याची माहिती नागरिकांना मिळाल्यास त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा नियंत्रण कक्ष, यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान नांदेड पोलिसांनी केले आहे.....

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें