सारखनी विध्युतवितरण कंपणीचे कार्यालय वाघा बॉडरवर असल्या सारखे भेदभाव, वाई बाजार येथील १३२ केव्ही फक्त वाई , मनिरामथड, वानोळा आणी माहुर येथील उप केंद्रासाठीच का ? जनतेचा सवाल, वाई बाजार येथील ३३ केव्ही विध्युत वितरण कार्यालयातुन सारखनी केंद्राला विध्युत मांगीतल्यास ऑप्रेटर सोबत अधीकारी करतात हुज्जत ? वरिष्ठ अधीकार्यांचे साफ दुरर्लक्ष, सुज्ञनागरीक उर्जा मंत्र्याकडे करणार तक्रार.
सारखणी विशेष प्रतिनिधी.
नांदेड जिल्यातील किनवट तालुक्याच्या सारखनी येथील विध्युत वितरण विभागाचे कार्यालय वाघा बॉडरवर आहे कि काय असा प्रश्न येथील नागरीकांना पडला आहे. या कार्यालयाला आनी बानीत वाई बाजार येथील विध्युत वितरण कंपनीच्या कार्यालयातुन विध्युत पुरवठा मांगीतल्यास तेथील अधीकारी सारखनी येथील कार्यालयाच्या ऑप्रेटरला शेकडो प्रश्न विचारतात आणी शेत मजुरा सारख सुनावतात आणी विध्युत पुरवठा द्यायला मज्जाव करतात अशे खाञी लायक वृत असल्याने आता सारखनी येथील विध्युत वितरण कंपणिचे कार्यालय वाघा बॉडरवर तर नाही ना ? म्हणुन येथील सुज्ञ नागरीक आता थेट राज्याचे मुख्यमंञी आणी उर्जा मंत्र्यांना लेखी तक्रार करणार असल्याचे विस्वसनिय वृत्त आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि किनवट तालुक्यातील सारखनी येथे विध्युत वितरण कंपणीचे ३३ केव्ही उपकेंद्र अनेक वर्षा पासुन कार्यान्वीत असुन येथुन २५ गावांना विध्युत पुरवठा दिला जातो, सारखनी येथील उप केद्राला किनवट येथील १३२ उपकेंद्रा मधुन विध्युत पुरवठा दिला जातो. माञ किनवट वरुन राजगड मार्ग असो कि मांडवी मार्ग असो १५ ते २० किलो मिटर हा जंगला मधुन विध्युत प्रवाह असल्याने पाऊस आणी वादळी वारा सुटला कि दोन्ही बाजुने ब्रेक डावुन घोषीत केली जाते. अश्या आनी बानीच्या परिस्तीथीत माहुर तालुक्यातील वाई बाजार येथील विध्युत वितरण कंपणीच्या ३३ केव्ही उप केंद्रा मधुन ऑप्रेटर द्वारे विध्युत पुरवठ्याची मांगणी केली जाते. या वेळी ग्राहकांना त्वरीत सुविधा देण्या एैवजी तेथील जबाबदार अधीकारी हे ऑप्रेटरला अनंत प्रश्न विचारुन निलंबीत करण्याची धमकी देतात, आणी आमच्या कडुन वारंवार विध्युत पुरवठा का घेतात म्हणुन दम देतात आणी ए.सी.साहेबांना तुमची तक्रार करतो म्हणुन कर्मचार्याला धारेवर धरतात. जनु वाई बाजार येथील विध्युत वितरण कंपणीच्या ३३ केव्ही उप केंद्रचे अधीकारी आपल्या घरा मधुन विध्युत पुरवठा देत आहेत असे दाख्वण्याचे प्रर्यत्न करतात असे खाञीलायक वृत्त आहे याला कोन जबाबदार असा प्रश्न पडला आहे.
तर दुसरीकडे नव्याने कायान्वील झालेल्या वाई बाजार येथील १३२ उप केंद्रातुन सारखनी ३३ केव्हीला वयक्तीक फिडर देण्यात आलेला नाही, तिथुन माहुर, वानोळा, मनीरामथड आणी वाई बाजार येथील उप केंद्राला विध्युत पुरवठा दिला जात आहे. माञ सारखनी या उप केंद्राला वाई बाजार येथील १३२ केव्हीचा पुरवठा का दिला जात नाही भेदभाव का केला जातो असे अनेक प्रश्न अनोत्तरीतच आहे. परंतु वानोठा आणी मनिरामथड या उप केंद्राला वाई बाजार येथील १३२ उप केंद्रा मधुन जाणारा विध्युत प्रव्हा हा पालईगुडा फाट्या वर असलेल्या टि पांईंट वरुन दिला जातो तिथुन केवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या सारखनी या उपकेंद्राला वाई बाजार येथील १३२ केव्ही चा सप्लाई का दिला जात नाही. सारखनी येथील विध्युत वितरण कंपनीचे उप केंद्र भारताच्या नकाशा वरुन वाघा बॉडरवर तर गेले नाही ? ना ? असा प्रश्न येथील नागरीकांना पडला आहे.
या प्रकरणात नांदेड येथील विध्युत वितरण कंपणीचे मुख्य अभीयंता राजाराम माने आणी अधीक्षक अभीयंता कंधारे साहेब यांनी जातीने लक्ष घालुन वाई बाजार येथुन सारखनी या उप केंद्राला ३३ केव्हीचा पुरवठा फिडर देवुन येथील नागरीकांची व ग्राहकांची होत असलेली पिळवणुक थांबवावी व वाई बाजार येथील अधीकार्यांने सारखनी येथील उपकेंद्राच्या ऑप्रेटरला नौकरासारखी वागणुक देण्याचे कार्य केले त्या अधीकार्याला भेदभाव करण्याचे सोडुन सहकार्य करण्याची भावणा ठेवण्याची समज द्यावी जेने करुन कर्मचारी मनसोक्तपने काम करतील.अन्यथा येथील सुज्ञ नागरीक थेट राज्याचे मुख्यमंञी व उर्जा मञी यांना निवेदना द्वारे तक्रार करुन रसत्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही हे माञ तेवढेच खरे.....


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें