ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

शनिवार, 18 अक्टूबर 2025

मांडवी शहरात आशिष किराणावर उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे व त्यांच्या पथकाची धाडसी कारवाई अवैध गुटख्यासह एक आरोपीला घेतले ताब्यात मोठी साखळी उघड होण्याची शक्यता.

मांडवी शहरात आशिष किराणावर उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे व त्यांच्या पथकाची धाडसी कारवाई अवैध गुटख्यासह एक आरोपीला घेतले ताब्यात मोठी साखळी उघड होण्याची शक्यता.



मांडवी प्रतीनिधी 

किनवट तालुक्यातील मौजे मांडवी शहरातील आषिश किराणा दुकान वर छापेमारी करून एक लाख तीस हजार रुपयांचा अवैध गुटखा व पान मसाला जप्त करून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे ही कारवाई माहूर उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे व त्यांच्या पथकाने केली आहे, या धडक कारवाईमुळे अवैध व्यवसायकात मोठी दहशत निर्माण झाली आहे, तब्बल पन्नास किलोमीटर अंतरावरून येऊन उपविभागीय पोलिस अधिकारी व त्यांच्या पथकाने ही कार्यवाही केल्याने मांडवी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर  प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की अलीकडेच माहूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचा कार्यभार नवनिर्वाचित उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांनी स्वीकारताच अवैध धंद्याकडे त्यांनी लक्ष केले आहे, दोन दिवसापूर्वीच त्यांनी माहूर तालुक्यात एका अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला ताब्यात घेऊन आरोपीवर कारवाई केली आहे. त्याच्यापाठोपाठ आज मांडवी शहरातील मुख्य बाजारपेठेत व रस्त्यावर असलेल्या आषिश किराणा दुकान मध्ये गोपनीय पद्धतीने जाऊन छापे मारी करत विविध प्रकारचा अवैध गुटखा व पान मसाला जप्त करून आरोपी आशिष कोटावार याला ताब्यात घेतले आहे. सदर गुटखा आरोपी ने कुठुन आनला याची चौकशी सुद्धा पोलीस आपल्या पद्धतीने करित असलेल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. याचा कनेक्शन तेलंगणा राज्याशी व सारखणी व वाई बाजार येथील गुटखा तस्करांशी असल्याचे बोलले जात आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास निश्चितच मोठी माशी गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मांडवी पोलीस इतर आरोपींचा छळा लावतात की त्यांचीच पाठ राखण करतात याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.मांडवी पोलिसांनी ईतर आरोपींचा छळा लावल्यास वरिष्ठ त्यांची प्रशंसा करतील यात कांहीच शंका नाही. उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या या कार्यवाहीने मात्र अवैध व्यवसायिकात मोठी दहशत निर्माण झाली आहे. 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें