सारखनी प्रतिनिधी
नांदेड जिल्यातील किनवट तालुक्याच्या सारखनी येथील एका किराना दुकान मधुन बनावट नोटा चलनात आणत असल्याची सर्वत्र चर्चा आहे,हि गंभीर बाब काही कार्यकत्यांनी कृषीमंञी धनंजय मुंडे यांच्या निर्दशनास आनुण देताच त्यांनी सारखणी येथील पञकार रशीद फाजलानी यांना मुलाखत देतांना म्हणाले जर कुनी व्यापारी बनावट नोटा चलनात आनत असेल तर माझ्या कडे तक्रार करा मि दोषी वर कार्यवाही करेन.हि बातमी प्रकाशीत होताच सारखनीत मोठ्या प्रमाणात हल चल होतांना दिसुन आली माञ आज सारखणी व रिसरात बातमी प्रकाशीत करणार्या पञकाराचीच सुपारी दिल्याची चर्चा होत असल्याने बनावट नोटांचा बिंग फुटू नये यासाठी सदर व्यक्ती हा या टोकावर जात तर नाही ना अशी चर्चा सुद्धा जोर धरू लागली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि दिनांक ११/१०/२०२४ रोजी राज्याचे कृषी मंञी धनंजय मुंडे हे नांदेड जिल्याच्या तिर्थक्षेत्र माहुर गड येथे दर्शनासाठी आले असता काही कार्यकत्यांनी सारखणी येथील ऐका किराणा दुकान मधुन बनावट नोटा चलनात आनत असल्याची हि गंभीर बाब नामदार मुंडे यांच्या निदर्शनास आनुण देताच कृषी मंत्री धनंजय मुडे यांनी पञकारांना म्हणाले व्यापारी जर कुनी बनावट नोटा चलनात आनत असेल तर माझ्याकडे तक्रार केल्यास मि लगेच त्या ठिकानी कार्यवाही करेल.
या मुलाखती नंतर प्रखळ लेखान करण्यासाठी प्रसिद्ध असलेले सारखनी येथील पञकार रशीद अजीजभाई फाजलानी यांनी दि.१३/१०/२०२४ रोजी बनावट नोटा प्रकरणाची व आदिवासी गोरगरीब जनतेची फसवणूक होत असल्या बाबत सविस्तर बातमी आपल्या यु टयुबच्या माध्यमातुन प्रकाशीत करुन आदीवासी बहुल भगातील जनतेला सावध केले व सदर दुकान चालताकाचे बिंग उघड केले.
या बातमी नंतर माञ सारखनी परिसरात चांगलीच चर्चा रंगु लागली असुन सदर दुकान चालकाला दहशतवाद विरोधी पथक ताब्यात घेवुन चौकशी करतील असे तर्क काढले जात आहेत. पञकार रशीद फाजलानी हे पाच वेळेची नमाज पठन करतात ते दि.१४/१०/२०२४ रोजी सायंकाळची नमाज पठन करण्यासाठी दुचाकी वरुन जात असतांना एका संशईत व्यक्तीने त्यांचा बुलेट गाडी वरुन पाठलाग करुन बनावट नोटांची बातमी का दिली म्हणुन धमकी दिली होती या बाबत पञकार रशीद फाजलानी यांनी सि.सि.टिव्ही फुटेज काढुन दि.१५/१०/२०२४ रोजी सदर व्यक्ती बाबत रित सर तक्रार दिली होती.तक्रार देवुन सुद्धा आज तिन दिवस झाले असले तरी अध्याप पर्यंत सिंदखेड पोलीस सादी चौकशी करीत नसल्याने पोलीसा बाबत संभ्रम निर्माण होत आहे.
माञ आज सकाळ पासुनच सारखनी चौकात चर्चा होत आहे कि बनावट नोटा प्रकरणाचा मुख्य सुञधार हा पञकार रशीद फाजलानी हे नमाज पठन करण्यासाठी किंवा मुली सह मुलाला शाळेत सोडण्यासाठी दुचाकी वरुन जातांना शुटरच्या माध्यमातुन घात पात किंवा अपघात करुन ठार करणार असुन या प्रकरणासाठी शुटरला सुपारी व रेकी करुन जागा नेमली असल्याचे सुद्धा बोलल्या जात आहे.
हत्तेच्या प्रकरणात महाराष्ट्र हादरत चालला आहे कधी कोन गोळ्या झाडुन कुनाची हत्या करेन हे सांगता येत नाही नांदेड जिल्यात सुद्धा गोळ्या झाडुन पञकाराच्या हत्येची नांदेड पोलीस वाट पहात तर नाही ना असा प्रश्न या प्रसंगी उपस्तीथ होत आहे.
सदर गंभीर प्रकारणात नांदेडचे पोलीस उप महा निरीक्षक शहाजी उमाप व जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी विषेश लक्ष केंद्रीत करुन सि.सि.टिव्ही फुटेजची आपल्या माध्यमातुन चौकशी करुन दोषीवर योग्यती कार्यवाही करावी अशी मांगणी सुज्ञ नागरीकातुन होत आहे....

Hindi Marathi patrakar Sangh jila karyaadhyaksh Mr Rajesh shantilal Borundiya yavatmal Maharashtra
जवाब देंहटाएं