सीमावर्ती भागात केले जाते बतकम्मा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
गजानन चिल्लावार
घाटंजी महाराष्ट्र राज्याच्या टोकाला असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील सीमावर्ती भागात येणाऱ्या सायफळ कुर्ली राजापेठ नारायणपेठ मंगी सावरगाव सह अनेक गावात तेलगू भाषिक नागरीक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे या परीसरातील धार्मिक पंरपरा दाक्षिणात्य परंपरेशी जोडली आहे दरवर्षी बतकम्मा उत्सव घाटंजी तालुक्यासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरतो पंधरा दिवस चालणाऱ्या या उत्सवात रात्री महीला मुली बतकम्मा देवीच्या गाण्यावर नाचगाण करीत असतात घाटंजी तहसीलचा काही भाग तेलंगाना राज्याला लागून असल्याने येथील नागरीकांची परंपरा आणि सण साजरे करण्याची पध्दत पुर्णपणे दक्षिणेकडील आहे दिवाळी दस-याप्रमाणेच बतकम्मा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो घटस्थापनेला या बतकम्मा उत्सवाची सुरवात करण्यात येते व कोजागिरी पौर्णिमेच्या दुस-या तिस-या दिवशी विविध रंगाच्या फुलापासून बतकम्मा देवी बनवून गावातील सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा करून बतकम्मा देवी च्या गाण्यावर महीला मुली नाचत असतात व सायंकाळच्या सुमारास लगतच्या पैनगंगा नदीपात्रात देवी चे विसर्जन केले जाते बतकम्मा हे गौरीचे रूप मानले जाते भाविकांच्या मते हा सण महीलांच्या श्रध्देशी संबधीत आहे या सणासाठी सासरी गेलेल्या मुली आपल्या माहेरी येत असतात यासणामुळे जणू घाटंजी तालुक्यातील सीमावर्ती दिवाळीच आहे का काय असे वातावरण दिसून येते या बतकम्मा उत्सवाला सीमावर्ती भागात मोठे महत्व दिले जाते.
अशी आहे बतकम्मा सणाची आख्यायिका
हजारो वर्षापूर्वी उत्तर तेलंगाना राज्यात एका जिल्ह्यातील घनदाट जंगलात काही राक्षसांनी कहर केला होता परीसरात राहणा-या महीलांच्या प्रतिष्ठेशी खेळू लागले होते काही स्रियांनी राक्षसाविरूध्द आवाज उठविला होता आणि महान ऋषिंना त्यांची दुर्दशा सांगितली होती राक्षसापासून सुरक्षित राहण्यासाठी ऋषिंनी महीलांना गौरी देवी चे पूजा करण्याचा सल्ला दिला मग त्या प्रांतातील महीला काही फुले गोळा करून पुजा करू लागल्या यावेळी गौरी माता प्रसन्न झाले माता गौरीने राक्षसांना मारण्याचे महीलांना वचन दिले यानंतर महीलांनी आपल्या प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी माता गौरीची पुजा करण्यास सुरुवात केली तेव्हा पासून या बतकम्मा उत्सवाला सुरवात झाली तिच परंपरा जपण्यासाठी महीला आजही बतकम्मा उत्सव साजरा करीत असतात.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें