ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

सोमवार, 10 जून 2024

सहाय्यक जिल्‍हाधीकारी मेघना कावली यांच्‍या मार्गदर्शना खाली भरारी पथकाने एका आठवळ्यात अवैध रेती तस्‍करी करणारे सहा टॅक्‍टर जप्‍त केले,तर अवैध दगड वाहतुक करणारे एक टिप्‍पर दोन टॅक्‍टर तर अवैध मुरुम वाहतुक करणारे दोन टॅक्‍टर जप्‍त करुन कार्यवाही केल्‍याने अवैध उत्‍खानन करणार्यामध्‍ये दहशत निर्माण झाली आहे.





सहाय्यक जिल्‍हाधीकारी मेघना कावली यांच्‍या मार्गदर्शना खाली भरारी पथकाने एका आठवळ्यात अवैध रेती तस्‍करी करणारे सहा टॅक्‍टर जप्‍त केले,तर  अवैध दगड वाहतुक करणारे एक टिप्‍पर दोन टॅक्‍टर तर अवैध मुरुम वाहतुक करणारे दोन टॅक्‍टर जप्‍त करुन कार्यवाई केल्‍याने अवैध उत्‍खानन करणार्यामध्‍ये दहशत निर्माण झाली आहे.

सारखणी प्रतीनीधी / रशीद फाजलानी

निवडणुका संपताच किनवटच्‍या सहाय्यक जिल्‍हाधीकारी मेघना कावली यांनी आपला मोर्चा अवैध रेतीतस्‍करी कडे वडवला असुन किनवट माहुर तालुक्‍यात भरारी पथक स्‍थापन केल्‍याने रेती तस्‍करांत कमालीची दहशत निर्माण झाल्‍याचे पहावयास मिळत आहे. 

या बाबत सविस्‍तर वृत्त असे कि सहाय्यक जिल्‍हाधीकारी मेघना कावली यांनी अवैध रेती तस्‍करी वर आळा घालण्‍या साठी महसुल विभागाचे पथक स्‍थापन केले असुन या पथकात मंडळ अधीकारी,तलाठी, तर वेळो वेळी पोलीसांची मदत घेण्‍याचे संकेत त्‍यांनी दिले आहेत ,म्‍हणुन महसुल विभागाचे अधीकारी कर्मचारी डोळ्यात तेल घालुन अहो राञ पर्यत्‍न करीत असल्‍याने एका आठवळ्यात किनवट तालुक्‍यात सहा अवैध रेती तस्‍करी करणारे टॅक्‍टर जप्‍त करुन तहसीलकार्यालयात लावण्‍यात आले असुन यात अवैध मुरुम व दगड वाहतुक करणाऱ्यां विरुद्ध कार्रवाई करण्यात आली आहे. किनवट तालुक्यातील मौ.मारेगाव (खालचे) येथे अवैध रेती वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर रात्री 2 च्या दरम्यान पकडून तहसील कार्यालयात लावण्यात आले. या पथकात गौतम पांढरे,आदिनाथ डुकरे,मेघश्यम सांगवीकर यांनी कामगीरी केली असून या वेळी ट्रॅक्टर मालकाने आणि चालकाने ट्रॅक्टर मधील रेती खाली करण्याचा प्रयत्न केला असता संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन महसूल विभागाच्या अधीकारर्यानी विश्वास फड , अंकुर सकवान, मंगेश बोधे , गोविंद पाम्पटवार या दुसऱ्या पथकाला आणि पोलीस प्रशासनाला बोलाऊन घ्यावे लागले. या कार्यवाहीत मा.सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली,किनवट तहसीलदार शारदा चौंडेकर आणी उप विभागीय पोलीस अधीकारी रामकृष्ण मळघने किनवट हे महसूल पथकाच्या संपर्कात राहून ट्रॅक्टर तहसील कार्यालयात येईपर्यंत संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण व बारकाईने लक्ष ठेऊन होते. तर मौ.पाटोदा तालुका किनवट येथे दिनांक 05/06/2024 रोजी दुपारी 1 च्या दरम्यान अवैध रेती वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पकडुन तहसील कार्यालयात लावण्यात आले. सदर कार्यवाहीत तलाठी गौतम पांढरे आणि रमेश अंकमवार यांच्या पथकाने कामगीरी केली.. किनवट तालुक्‍यातील मौ.मोहपुर येथे अवैध रेती वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर रात्री 3:00 च्या दरम्यान पकडुन तहसील कार्यालयात लावण्यात आले. या पथकात तलाठी गौतम पांढरे आदिनाथ डुकरे , मेघश्याम सांगवीकर, प्रदिप सोनटक्के (पो.पा.) हे होते. तर मौजे भंडारवाडी येथील शिवारात पैनगंगा नदी काठी अवैध्‍य रेती वाहतुक करताना एक ट्रॅक्टर पकडुन पोलीस स्टेशन इस्लापुर येथे लावण्यात आले सदर कर्यवाहित माणिक बोधगिरे तलाठी,अनिल कदम पोलीस पाटील रिठा हे होते, मौ.राजगड ते राजगड तांडा या मार्गांवर अवैधरित्या दगड वाहतूक करणारे एक टिप्पर,दोन ट्रॅक्टर तहसील कार्यालय किनवट येथे लावण्यात आले, सदर पथकात तलाठी तेलंग मॅडम, डुकरे मॅडम, गेडाम मॅडम, केंद्रे मॅडम,आत्राम मॅडम व मेटकर मॅडम हे होते.तसेच मंडळ अधीकारी पटणे सर, सिंगेवार सर, कांबळे सर, तलाठी यू.आर.जाधव तलाठी विश्वास फड हे होते.

मौजे बेंदी तांडा येथे अवैध मुरूम वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर महसुल पथकाने पकडुन तहसिल कार्यालय किनवट येथे लावण्यात आले सदर पथकात मंडळ अधिकारी जयराम गाडे, मंडळ अधिकारी दंतुलवाड ,सिंगेवार,तलाठी प्रियंका डुकरे, सिंधु आत्राम, सचिन धुमाळे, यू.आर.जाधव हे होते तर किनवट तालुक्‍यातील मांडवी परिसरात परसराम नाईक तांडा तें उन्‍केश्‍वर मार्गावर अवैध रेती तस्‍करी करणारे एक टॅक्‍टर जप्‍त करुन पोलीस ठाने मांडवी येथे लावण्‍यात आले या कार्यवाहीत तलाठी विशाल सटलावार,तलाठी बि.एल.काळे यांच्‍या पथकाने कामगीरी केली असुन त्‍यांच्‍या पथकाने एका आठवळ्यात दोन वाहनावर कार्यवाही केली आहे.

या धडक कार्यवाहीने अवैध उत्‍खनन करणार्रया वाहन मालकांचे धाबे दनाणले असुन यात महसुल प्रशासनाला दंडात्मक कार्यवाहीने मोठा महसुन प्राप्‍त होणार आहे हे माञ तेवढेच खरे. अचानक या कार्यवाही ने तत्‍कालीन सहाय्यक जिल्‍हाधीकारी कार्तिकेएन एस. यांची आठवण करुन दिली हे माञ विषेश कारण तयांनी किनवट माहुर तालुक्‍यातील अवैधरेती तस्‍करी करणार्यांना सळो कि पळो करुन सोडले होते....   


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें