दिनांक 10 जून च्या मध्यरात्री उशिरा पुन्हा किनवट तालुक्याच्या मांडवी परिसरात दोन ट्रॅक्टर अवैध रेती सह जप्त, मांडवी पोलिसात जमा.
मा.सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली व मा.तहसीलदार किनवट शारदा चोंडेकर यांच्या मार्गदर्शना खाली मौ. नागापुर ते मांडवी दरम्यान अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडुन मांडवी पोलिस ठाण्यात लावण्यात आले ,सदरील पथकात तलाठी बि.एल. काळे, प्रदिप कदम, विक्रम चौधरी होते. मागील आठवड्यात किनवट तालुक्यात बारा अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर वर कारवाई झाल्याने अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांची चांगलीच मुस्कटदाबी झाल्याचे दिसून येत आहे परत आज झालेल्या या कारवाईने किनवट तालुक्यातील महसूल प्रशासन सज्ज असल्याचे पहावयास मिळत आहे हे मात्र तेवढेच खरे.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें