किनवट /प्रतिनिधी
किनवट वनविभागाने केलेल्या कारवाईत एक इंडिका कारसह अवैध सागवान जप्त करण्यात आले असून तस्कर मात्र फरार होण्यात यशस्वी झाले. सहाय्यक वनसंरक्षक जी.डी. गिरी यांना मिळालेल्या माहितीवरून किनवट ते चिखली बुजरुग रोडवर एका संशयीत इंडिका कारचा पाठलाग करून आरोपी पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपी मुद्देमाल सोडून फरार झाले. वाहनाजवळ जाऊन तपासणी केली असता त्यामध्ये अवैध कट साईज सागी मिळून आला, ही कार्यवाही उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक किनवट पी.एल. राठोड, वनपाल एस. एम. कोम्पलवार, एम. एन. कत्तूलवार, एस.एम. यादव, एस.बी. संतवाले, वनरक्षक रवी दांडेगावकर, बालाजी झंपलवाड, वाहन चालक बी. टी. भूतनर, बाळकृष्ण आवले, नूर शेख वनमजूर यांचा या कार्यवाहीत समावेश होता.या कारवाईत सागी कटसाईजचे २०९ नग, ज्याची किंमत २०५७८.००, कार असा एकूण ५०५७८.०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असून सागवान तस्कर नेहमीप्रमाणे फरार झाले.
दिनांक 17/01/2024 रोजी मध्यरात्री वेळ 1 ते 2 वाजेच्या दरम्यान सी. जी. पोतुलवार ,वनपरिक्षेत्र अधिकारी, बोधडी यांच्या नेतृत्वात गुप्त माहिती वरुन नियतक्षेत्र भुलजा कक्ष क्र. २१४B मधील जंगल भागामध्ये वनतस्कर सागी मालाचे तस्करी करीत असल्याची माहिती मिळाल्यावर मध्यरात्री सापळा रचून जंगल भागातून सागी नग काढून अशोक लिलँड कंपनीचा ( DJ DOST) या चार चाकी गाडी मधून सागी माल भरून निघताच तिचा पाठलाग करून सर्व वन कर्मचाऱ्यांनी सोमेश्वर महादेव मंदिर मदानापुर येथे गाडी अडविली असता अंधाराचा फायदा घेऊन चालू गाडी वन कर्मचाऱ्याच्या अंगावर सोडून वन तस्कर गाडीतून उडी मारून जंगलाच्या दिशेने अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला,होता सदर कार्यवाहीत अशोक लीलँड ( DJ DOST) वाहन क्र. AP28 TE 8313 (अंदाजित किंमत रु. 150,000) व सागी नग 17 (त्यांचे घ. मी. -1.521 किंमत - रु.32093) जप्त करण्यात आले होते तर फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच किनवट तालुक्याच्या अप्पाराव पेठ भागात वनविभागाच्या अधिकार्याने सागवान जप्त करून कारवाई केली होती त्यात सुद्धा आरोपी फरार झाले होते किनवट चा जंगल हा मौल्यवान सागवान साठी प्रसिद्ध असून अशा या मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करण्यासाठी सागवान तस्करांनी डोके वर काढले आहे. किनवट तालुक्यात मागील तीन महिन्यापासून सागवान तस्करीच्या अनेक कारवाया होताना पाहावयास मिळत आहे, या सर्व मौल्यवान सागवान तस्करी मागे खांन नावाचा व्यक्ती मास्टर माईंड असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात होतांना पाहावयास मिळत आहे. वनविभागाचे अधिकारी त्या खांन नावाच्या व्यक्तीला धरून त्याच्यावर कारवाई करतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें