किनवट प्रतिनिधी
किनवट तालुक्याच्या मोहपुर भागात माजी आमदार प्रदीप नाईक यांनी भेट दिली यावेळी गोरगरिब व शेतकऱ्यांची रखडलेली कामे तहसीलदारांना दूरध्वनीवरून माहिती देऊन समस्या सोडवण्याची केली विनंती.
याबाबत सविस्तर असे की माजी आमदार प्रदीप नाईक यांनी अलीकडेच मोहपूर येथे भेट दिली असता गावातील प्रतिष्ठित मंडळी सह नवयुवक व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन नाईक यांना आपल्या अडीअडचणी सांगितल्या तेव्हा प्रदीप नाईक यांनी गावातील व शेतकऱ्यांच्या आजपर्यंत न मिळालेल्या नुकसान भरपाईचा मावेजा व इतर समस्या सोडविण्यासाठी किनवटच्या नवनिर्वाचित तहसिलदार श्रीमती कावली मेघना यांना फोन द्वारे सविस्तर माहीती दीली व आदिवासी आणि मागासलेल्या गोरगरीब जनतेच्या सर्व अडचणी लक्षात आणून दिल्या तहसीलदार यांनी या ग्रामीण भागासाठी विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रदीप नाईक यांनी जनतेस संवाद साधताना म्हणाले काहीही अडचण असो मी आपल्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर आहे असे आश्वासन प्रदीप नाईक यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले. ग्रामपंचायत मोहपुर व गावकऱ्यांच्या वतीने प्रदीप नाईक यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बंडुसिंग नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य बंडु पाटील भुसारे, माजी समन्वय समिती अध्यक्ष विनोद राठोड, कॉ शंकर सिडाम,अँड राहुन नाईक, युवा नेते कुंदन पवार, यांच्यासह गावातील ज्येष्ठ मंडळी सह नवयुवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नवयुकांनी आपकी बार नाईक सरकार असे उद्घोषित केले.





कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें