सिंदखेड पोलिसांकडून शांतता कमिटीचे आयोज.
सारखणी प्रतिनिधी
एप्रिल 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूक, रमजानईद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुढीपाडवा, श्रीराम नवमी, हनुमान जयंती अशा सर्व समाजाच्या धार्मिक प्रव एप्रिल महिन्यात आला असून निवडणुकीच्या रंग धुमाळी सुद्धा याच महिन्यात असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान आले आहे या सर्व परिस्थितीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण प्रकाश कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे उपविभागीय पोलीस अधिकारी दादाराव सीनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किंनगे यांनी दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी सारखणी येथील पोलीस चौकीत सारखंनी येथील प्रतिष्ठित व्यापारी पत्रकार व ग्रामस्थांना घेऊन एका शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वरील सर्व धार्मिक पर्व व निवडणुकीच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये असे काही संशयित आपल्याला निदर्शनास आले तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा अशी विनंती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किंनगे यांनी यावेळी केली. असे तर सारखणी व परिसर शांतिप्रिय मानला जातो मात्र निवडणुकीच्या काळात व धार्मिक पर्वाचा फायदा घेऊन काही विग्नसंतोषी व समाजकंटक उपद्वाप करण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून पोलिसांनी पूर्वतयारी केल्याचे यावरून दिसून येत आहे, असे कुठलेही अनुचित प्रकार घडवण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस त्यांना शोक उत्तर देईल असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी पवन जयस्वाल, डॉक्टर रामराव पवार, लक्ष्मण मिसेवार, फकीरा नाईक, पत्रकार सिद्धार्थ मुनेश्वर, मझर शेख, सचिन भाऊ, रशीद फाजलानी व पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें