ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

मंगलवार, 31 अक्टूबर 2023

शासनाला जागे करण्यासाठी व मनोज जरांगे यांना व त्यांच्या मागणीला पाठींबा म्हणून त्रीशुल पाटील यांचा आमरण उपोषण सुरू,तर सर्व धर्म बांधवांनी दिला पाटील यांना समर्थन.



 शासनाला जागे करण्यासाठी व मनोज जरांगे यांना व त्यांच्या मागणीला  पाठींबा म्हणून त्रीशुल पाटील यांचा आमरण उपोषण सुरू,तर सर्व धर्म बांधवांनी दिला पाटील यांना समर्थन. 

सारखनी प्रतिनिधी रशीद फाजलानी 

सारखणी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी साखळी उपोषण व आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात मोर्चे, निदर्शने, उपोषण ,आमरण उपोषण इत्यादी सनदशिर मार्गाने शासनाकडे आरक्षणाची मागणी होत आहे, याचाच एक भाग म्हणून सारखणी येथे त्रिशूल माणिकराव पाटील यांनी दिनांक 26 ऑक्टोबर 2023 पासून साखळी उपोषण तर दिनांक 30 ऑक्टोबर 2023 पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे, सारखणी परिसरातील विविध गावातील मराठा बांधवा सोबतच अन्य जातीसंमर्गातील लोकांचा मोठ्या प्रमाणात उपोषणाला पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. मराठा समाजाचे सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात यावा या महत्वपूर्ण मागणीला शासन मात्र केराची टोपली दाखवत असल्याचे दिसून येते, उपलब्ध झालेल्या साडेअकरा हजार पुराव्याच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची मोहीम शासनाने चालू केली आहे, प्रत्यक्षात ज्यांच्याकडे पुरावे उपलब्ध आहे त्यांना प्रमाणपत्र देणे हे तर अनिवार्य आहे, मग शासनाने मराठा समाजाला काय दिले ?असा प्रश्न उपोषण करते त्रिशूल पाटील यांनी उपस्थित केला आहे, शासनाने अधिक संयम न पाहता सरसकट आरक्षण जाहीर करावे अन्यथा आमरण उपोषण चालूच राहील असा गंभीर इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे,



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें