ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

बुधवार, 27 सितंबर 2023

महात्मा ज्योतिबा फुले सह. गृहनिर्माण संस्थेच्या जागेवरील फेरफार रद्द करण्याची मागणी!


 महात्मा ज्योतिबा फुले सह. गृहनिर्माण संस्थेच्या जागेवरील फेरफार रद्द करण्याची मागणी!


माहूर:- महात्मा ज्योतिबा फुले सहकारी गृहनिर्माण संस्थेची जागा कुठल्याही प्रकारे खरेदी-विक्री सौदे पत्र किंवा मुद्रांक लिहून दिले नसताना ७/१२ नोंदणी झालेली आहे.ती नोंदणी रद्द करावी अशी मागणी महात्मा ज्योतिबा फुले सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष निरधारी जाधव यांनी महसूल मंत्री सह सर्व संबंधितांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले सहकारी गृहनिर्माण संस्थेची माहूर शहरात गट क्रमांक १९५ मध्ये मालकी व ताब्यातील जागा आहे.त्या पैकी काल्पनिक खाते क्रमांक १०८१ अर्पणा अतुल कडु नाम व्यक्ती क्षेत्र ०.०३.०० यांनी फेरफार क्र. २१९२ जागा ही संस्था मार्फत तत्कालीन अध्यक्ष किंवा विद्यमान अध्यक्षांनी कुठल्याही प्रकारे खरेदी-विक्री खत, सौदे पत्र किंवा मुद्रांकावर लिहून दिले नसताना फेरफार झाला आहे. विशेष म्हणजे सदर व्यक्ती हा संस्थेचा सभासद किंवा सबंधित नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून या प्रकरणी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष निरधारी ज्ञानेश्वर जाधव यांनी 
सदर जागा ही छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपीता महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि महात्मा ज्योतिबा फुले नगर परिसरातील नागरिकांसाठी उद्यानाकरीता आरक्षित क्षेत्र असल्याचे सांगितले असून ७/१२ वर बेकायदेशीरपणे झालेली नोंद रद्द करण्याची मागणी केली आहे. निवेदिनाच्या प्रति महसूल मंत्री, विभागीय आयुक्त पासून ते तलाठी पर्यंत देण्यात आल्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें