किनवट तालुक्यातील मारेगाववरून घोटी मार्गे लोणीला जाणारे अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पथकाने पकडले
सारखनी प्रतिनिधी रशीद फाजलानी
किनवट तालुक्यातील मारेगाववरून घोटी मार्गे लोणीला जाणारे अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर मौ.लोणी येथे पकडून तहसील कार्यालय किनवट येथे पुढील कार्यवाहीसाठी लावण्यात आले.
सदर कार्यवाही मा.तहसीलदार मृणाल जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 27/09/2023 रोजी रात्री 2 च्या दरम्यान मंडळ अधिकारी डी.आर.कांबळे, घोटी सज्जाचे तलाठी गौतम पांढरे , आदिनाथ डुकरे (तलाठी लोणी), मेघश्याम सांगवीकर (तलाठी मारेगाव) यांच्या पथकाने केली. सदर पथकाने आज पर्यंत मांडवी,सारखनी,राजगड सह अनेक परिसरात सापळा रचून अवैध रेती वाहतूक करनारे वाहन पकडून दंडात्मक कार्यवाही केली हे मात्र विषेश.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें