ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

गुरुवार, 24 जून 2021

बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखविणारी आंतरराज्‍य टोळी जेरबंद, विस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्‍त -मा.निसार तांबोळी.

 

बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखविणारी आंतरराज्‍य टोळी जेरबंद-मा.निसार तांबोळी.

 

प्रतिनीधी रशीद फाजलानी

नांदेड / हिंगोली स्‍थानीक गुन्‍हे शाखा आणी वसमत शहर पोलीयांच्‍या संयुक्‍त कार्यवाही मध्‍ये भारताच्‍या वेगवेगळ्या भागातील बेरोजगार युवकांना नोकरीचे आमीष दाखवुन करोडो रुपये लुटणार्या टोळीला दिल्‍ली,मुंबई,लखनऊ आणी नांदेड या भागा मधुन अटक करण्‍यात आली आहे. पोलीसांनी सहा जणांना अटक करुन त्‍यांच्‍या कडुन विस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्‍त केल्‍याचे नांदेड परिक्षेञाचे विषेश पोलीस महानिरीक्षक मा.निसार तांबोळी यांनी पञकार परिषदेत दिली...


     या बाबत अधीक माहिती अशी कि, हिंगोली जिल्‍याच्‍या वसमत पोलीस ठाण्‍यात संतोष बनवारीलाल सरोज रा.बोर्डेपुर,तालुका मच्छली,जिल्‍हा जोनपुर (उत्‍तर प्रदेश) याने सन २०१८ मध्‍ये वसमत जिल्‍हा हिंगोली येथील एका बेरोजगार  युवकाला  रेल्‍वे  मध्‍ये शासकिय नौकरी लावुन देतो म्‍हणुन वेळो वेळी विविध बॅंक खात्‍या मार्फत व नगदी असे दहा लाख रुपये घेवुन अध्‍याप पर्यंत नौकरी न लावता त्‍याची फसवणुक केली होती.हे लक्षात आल्‍यानंतर वसमत शहर पोलीस ठाण्‍यात भादवीचे कलम ४२०,३४ अन्‍वये गुन्‍हा दाखाल झाला होता. तसेच फिर्यादी सारख्‍या अनेक बेरोजगार मुलांची फसवणुक करुन आरोपीनी कोट्यवधी रुपयाची फसवणुक केल्‍याचे सांगीतल्‍याने गुन्‍ह्याची व्‍याप्‍त खुप मोठी असल्‍याचे प्रथमदर्शनी निष्‍पन्‍न होत होते.

     गुन्‍हेगारांचे गर्दनकाळ म्‍हणुन परिचीत असलेले नांदेड, लातुर, परभणी, व हिगोली जिल्‍याचे विषेश पोलीस महानिरीक्षक श्री.निसार तांबोळी साहेब यांणी या गंभीर प्रकरणात विषेश लक्ष देत हिंगोलीचे जिल्‍हा पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर,अतिरीक्‍त पोलीस अधीक्षक यशवंत काळे,याच्‍या मार्गदर्शनाखाली दोन विषेश पोलीस पथक  तैयार केले,यात सहाय्यक पोलीस अधीक्षक सतीश देशमुख यांच्‍या मार्फतीने गुन्‍ह्याच्‍या तपासावर विषेश लक्ष केंद्रीत केले.त्‍यात हिंगोली स्‍थानीक गुन्‍हा शाखेचे पोलीस उप निरीक्षक शिवसांब घेवारे, वसमत शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोदनापोड, व त्‍याचे यहकारी पोलीस जमादार किशोर कातकळे, विठ्ठल काळे, जयप्रकाश जाळे, पोलीस नाईक सदिप चव्‍हाण रवि ठेंबरे, विवेक गुंडरे, बालाजी बोरगावे यांचा समावेश होता.

     सर्व प्रथम पोलीस पथकाने सदर गंभीर गुन्‍ह्यातील आरोपींचा शोघ घेण्‍यासाठी ९ जुन २०२१ रोजी रेल्‍वे स्‍टेशन परिसर नांदेड येथे सापळा रचुन गुन्‍ह्यातील आरोपी रविंद्र ऊर्फ राबींद्र दयानिधी संकुवा वय ४६ वर्षे रा.ओडीसा हल्ली मुक्काम काटेमान्‍नेवली तालुका कल्‍याण जिल्‍हा ठाणे अॅड. नरेद्र विष्‍णुदेव  प्रसाद वय ५५ वर्ष राहणार लयरोपरुवार तालुका कोपागंज जिल्‍हा महु उत्‍तर प्रदेश यांना ताब्‍यात घेवुन अधीक तपास केला असता त्‍यांनी अनेक मुलांची फसवणुक केल्‍याची कबुली देवुन त्‍यांचे ईतर साथीदार दिल्‍ली, मुंबई, नांदेड व लखनऊ या ठिकानी असल्‍याचे सांगत संपुर्न भारतामध्‍ये शेकडोमुलांचे करोडो रुपये घेवुन बनावट नियुक्‍तीपञ देवुन फसवणुक केल्‍याचे ही कबुली दिली.

     त्‍या वरुन पोलीस पथकाने सायबर सेलच्‍या मदतीने ११ जुन २०२१ रोजी पुन्‍हा नांदेड शहरात सापळा रचुन आरोपी सतीश तुळशीराम हंकारे वय ३६ वर्ष राहणार बोरगाव तालुका लोहा हल्‍ली मुक्काम अहमदपुर  जिल्‍हा लातुर व नांदेड, आनंद पांडुरंग कांबळे वय २४ वर्ष राहणार अहमदपुर जिल्‍हा लातुर यास ताब्‍यात  घेवुन सखोल चौकशी केली असता त्‍यांनी अनेकांची फसवणुक केल्‍याचे समोर आले. त्‍यांच्‍या माहीती वरुन पोलीस भरतीची अकॅडमी चालवुन बेरोजगारांना फसवल्‍याचे सांगीतले.

     १३ जुन २०२१ रोजी आरोपींना घेवुन पोलीस पथक मुंबई येथे दाखल झाले. तेथे गौतम एकनाथ फणसे वय ५६ वर्ष रा.वाघणी ता.अंबरनाथ जिल्‍हा ठाने यास ताब्‍यात घेतले त्‍याने मुंबई  परिसरातील अनेक बेरोजगारांना फसविल्‍याची कबुली दिली. त्‍या नंतर पथकाने दिल्‍ली गाठुन अभय मेघशाम रेडकर ऊर्फ राने वय ४८ वर्ष रा.मोतीनगर न्‍यु.दिल्‍ली मुळ पत्‍ता शिरोडा तालुका वेंगुर्ले जिल्‍हा सिंधुदुर्ग यास सापळा लावुन अटक केली. त्‍या नंतर गुन्‍ह्यातील मुख्‍य आरोपी मास्‍टर माईंड संतोषकुमार सरोज वय २९ वर्ष रा.बोडेपुर तालुका मच्छली जिल्‍हा जौनपुर उत्‍तरप्रदेश यास पकडण्‍यासाठी पथक रवाना झाले.

    त्‍याला लखनौ येथील एका लॉज मधुन ताब्‍यात घेतले. त्‍याची व राहण्‍याच्‍या ठिकाणाची झाडती घेतली असता विविध मंञालयातील सचिव दर्जाच्‍या अधीकारी यांचे बनावट स्‍टॅम्‍प, रेल्‍वे अधीकारी यांच्‍या नावाचे नियुक्‍तीपञ तयार करण्‍यासाठी लागणारा कागद, लॅपटॉप, रेल्‍वेचे बनावट ओळखपञ, अनेक मुलांचे बनावट नियुक्‍तीपञ, अनेक एटीएम कार्ड, मोबाईल सदर आरोपी त्‍याच्‍या खात्‍यावर  झालेले बॅंक व्‍यवहार याची सर्व माहीती व साहीत्‍य आरोपी महाशया कडुन जप्‍त करण्‍यात आले.

     सदर गुन्‍ह्या मध्‍ये आता पर्यत आरोपींनी वापरलेली १८ बॅंक खाते होल्‍ड करण्‍यात आले असुन त्‍याच्‍या खात्‍यावरील ११ लाख रुपये सिल करण्‍यात आले आहेत. तसेच आरोपींन कडुन नगदी ५६ हजार रुपये एक कार आठ लाख रुपये, सात मोबाईल फोन,५० हजार रुपये,असा एकुण २० लाख सहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्‍त करण्‍यात आल्‍याची सविस्‍तर माहीती श्री.निसार तांबोळी साहेब यांनी दिली आहे. सदरची फसवणुक हि वरिल आरोपी व त्‍यांचे साथीदार मिळुन मागील दहा वर्षा पासुन महाराष्‍ट्र, ओरीसा, आंध्रप्रदेश, तेलेगाना, मध्‍यप्रदेश, उत्‍तरप्रदेश, हरियाणा, दिल्‍ली, पच्छीम बंगाल या राज्‍यासह ईतर अनेक राज्‍यातील बेरोजगार मुलांची फसवणुक केल्‍याचे सांगत आहेत.

     सदरची कार्यवाही विषेश पोलीस महानिरीक्षक मा.निसार तांबोळी साहेब हिंगोली चे जिल्‍हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर ,अतिरीक्‍त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक सतिश देशमुख, स्‍थानीय गुन्‍हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराव, वसमत शहरचे पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, यांच्‍या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोदनापोड,आणी फोजदार शिससांब घयवारे यांच्‍या पथकाने केली या पथकाचे श्री.निसार तोबोळी साहेब यांनी कौतुक करुन पोरीतोषीक जाहीर केले आहे.

सदर गुन्‍ह्याची व्‍याप्‍ती पाहता महाराष्‍ट्रातील फसवणुकीचा हा सर्वात मोठा गुन्‍हा पांलीसांनी उघडकीस आनला असुन या गुन्‍ह्याची व्‍याप्‍ती व तार ईतर राज्‍यात जुळले असुन पर राज्‍यातुन आरोपींना अटक करने म्‍हन्‍जे पोलीस पथकाला आपले जिव मुठीत घेवुन काम करावे लागले हे माञ तेवढेच खरे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें