प्रतिनिधी रशीद फाजलानी
किनवट (तालुका प्रतिनिधी) :- दि २८ आदिवासी बांधवाच्या समस्या सोडवितांना आदिवासी लोक प्रतिनिधी बाबत आक्रमक भूमीका न घेता त्यांच्याकडून सांमज्यातुन काम करून घेणे गरजेचे आहे. सुप्रिम कोर्टाच्या आदेशाची अमंलबजावणी करून बोगस आदिवासींनी बळकावलेल्या जागी खऱ्या आदिवासींयाची विशेष नोकरभरती, बेरोजगारी, पदोन्नती आरक्षण विरोधी आदेश यासह आदिवासींच्या ज्वलंत प्रशनासाठी आखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी परिषदेने जनाधिकार उलगुलान रथ यात्रेला माझा पाठींबा असून यासाठी कुठल्याही लढयात मी आपल्या सोबत राहणार आहे. असे प्रतिपादन आमदार भिमराव केराम यांनी आखिल भारतीय आदिवासी विकास प्रकल्पाने राज्यभरात काढलेल्या उलगुलान रथ यात्रेच्या किनवट येथे स्वागत संभारंभात बोलतांना केले.यावेळी या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लकीभाऊ जाधव प्रदेश महानिरिक्षक निरज चव्हाण, प्रदेश संघटक अजय कोवे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी परिषदेने त्यांच्या विविध न्याय मागण्यासाठी राजयभर् उलगुलान रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही रथ यात्रा 27 जून रोजी किनवट येथे आली असता आमदार भिमराव केराम यांनी या रथ यात्रेचे स्वागत केले. प्रारंभी महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव, निरज चव्हाण, संदिप गवारी, अजय कोवे, परभणी अध्यक्ष भगीरथ मिरासे, जालना जिल्हाध्यक्ष जालंधर चव्हाण यांनी या रथ यात्रेचे व आदिवासींच्या विविध 8 मागण्यांचे माहिती दिली येत्या पावसाळया आदिवेशनात विधानसभेत आमच्या मागण्या सोडविण्यासाठी आमदार भिमराव केराम यांनी यासाठी पुढाकार घ्यावा अशी विंनती यावेळी करण्यात आली. प्रारंभी आदिवासी विकास परिषदेच्या वतीने आमदार भिमराव केराम यांचा सत्कार करण्यात आला तर आमदार केराम यांनी रथ यात्रेतील मान्यवरांचा प्राथनिधीस्वरूपात सत्कार केला यावेळी आदिवासी कर्मचारी संघटनेचे नेते नागोराव खंदारे, बन्सी लंके, डॉ. विशाल भोसीकर, दारासींग पावरा, शेषेराव कोवे, प्रकाश शेळके, खोकले सर, सभापती दत्ता आडे, प्रतिक केराम, निळकंठ कातले, संतोष मरसकोल्हे यांच्यासह आदिवासी विद्यार्थी परिषदेचे मराठावाडयातील युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें