ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

सोमवार, 28 जून 2021

मागील 4 वर्षापासून किनवट येथे तहसील कार्यालयाच्या नविन ईमारतीचे बांधकाम सुरू असल्याने

 


प्रतिनिधी रशीद फाजलानी 

किनवट (तालुका प्रतिनिधी) :- मागील 4 वर्षापासून किनवट येथे तहसील कार्यालयाच्या नविन ईमारतीचे बांधकाम सुरू असल्याने शहरापासुन 4 कि.मी. अंतरावरील गोकुंदा येथील औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या ईमारतीत तहसीलचा कारभार सूरू असून तेथे जाणे-येणे करण्यासाठी गोरगरीबांना ॲटो करण्यासाठी 50 रू. मोजावे लागतो सद्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर असल्याने पाऊस पडताच चिखल व पाण्यामुळे हा रस्ता सर्व वाहन धारकासाठी धोक्याचा व मृत्युच्या सापळा झाला आहे. जनसामान्याचा हा त्रास दुर करण्यासाठी नविन तहसील कार्यालयाचे बांधकाम पुर्ण झाले असून कोरोनामुळे या ईमारतीच्या लोकार्पण सोहळयाला कुणीही मंत्री येत नसल्याने एखादया सामान्य् नागरीकांच्या हस्ते तहसील कार्यालयाच्या नविन ईमारतीचा शुभारंभ करावा अशी ही मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे उमाकांत कऱ्हाळे पाटील यांनी सहाय्यक् जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. यावेळी युवा मोर्चाचे चिटणीस स्वागत आयनेनीवार, रोशन जाधव, शेख लतिफ, देवानंद मुंडे, सुरेश साकपेल्लीवार, अजय राठोड हे उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें