प्रतिनीधी रशीद फाजलानी
माननीय विठ्ठलराव जाधव साहेब हे सामाजिक ,राजकीय, क्षेत्रातील एक व्यक्तिमत्व असुन तरीपण पोलीस दलातील विशेष पोलीस महानिरीक्षक या पदावर ती आपली मजल मारून सर्वधर्मसमभावाच्या विचारांनी सर्व लोकांना एकत्र करण्याचा एक सक्षम बळ विचाराच्या माध्यमातून दिलेले आहे .जाधव साहेब म्हणजे एक निर्भीड व्यक्तिमत्व तळागाळातील गोरगरीब लोकांना मदतीचा आशेचा किरण वाटणारे अशा याच आपल्या कृतीतून कर्म करणारे ज्यांनी पोलीस दलामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सेवा करून पंढरीच्या पांडुरंगा प्रमाणे सर्वांना माया ,ममता, जिव्हाळा लावलेला आहे या अधिकाऱ्याच्या एक महान व्यक्तीमत्त्वाबाबत सन्मानाचा आणि आदरपूर्वक कर्म कार्याचा मी आपल्या लेखणीतून जितका होईल तितका कार्य गौरव सांगत आहे .जाधव साहेब हे तर एक पोलीस विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृहा महाराष्ट्र राज्य होतेच
पण ते एक वक्ता ,एक लेखक एक शांतीदुत सामाजिक संस्था ,एक सामाजिक, क्षेत्रितील व्यक्तिमत्त्वाने अष्टपैलू असलेले व्यक्तिमत्व आहेत.जाधव साहेब यांच्या कार्याचा गौरव शब्द लेखणीतून अपुरे पडतील जाधव साहेबांविषयी जेवढं बोलावं तेवढे कमीच आहे ज्यांनी '
या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगातुन विचार आत्मसात करून ज्या ठिकाणी आपलं कर्तव्याच कार्यक्षेत्र असेल त्याठिकाणी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतलेला होता..एक पर्यावरण प्रेमी अधिकारी म्हणुन त्यांचं कार्य होत. पोलीस दल आणि लोक समन्वयाच्या भावनेतून लोकपरस्परपुरक कार्य लोकांना आणि पोलिसांमध्ये समन्वय साधण्यासाठी पोलीस मित्र ही संकल्पना कृतीत आणून जनता आणि पोलिसांचं नातं विचाराच्या माध्यमातून , सहकार्याच्या माध्यमातून माननीय जाधव साहेबांनी पूर्ण घट्ट केललं आहे. असेच कार्य हे भविष्यामध्ये साहेबांच्या हातून व्हावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि साहेबांना दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना करतो आणि पंढरीच्या पांडुरंगा प्रमाणे साहेबांची सर्वावरती माया असावी येथे मी या लेखनातून सांगून माझ्या शब्दांना व लेखणीला पूर्णविराम देतो.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें