प्रतिनीधी रशीद फाजलानी
किनवट ता.प्र दि २४ आज मुंबई येथे संपन्न झालेल्या भाजपाच्या राज्य कार्यकारणी बैठकीत सुधाकर भोयर यांची भाजपा किसान मोर्चाच्या प्रदेश सरचिटणिस पदी निवड करण्यात आले. या आयोजित बैठकीत माजी मुख्यमंत्री व राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणविस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, प्रदेश संघटन मंत्री श्रीकांत भारतीया, किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे यांची निवडीचे पत्र देऊन सत्कार केला.
आज दिनांक़ २४ जुन रोजी भाजपा प्रदेश कार्यालय वसंत स्मृती दादर मुंबई येथे आयोजित केलेल्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री व राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणविस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, प्रदेश संघटन मंत्री श्रीकांत भारतीया, किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रसाद लोढा, आ.आशिष शेलार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खा.प्रताप पाटील चिखलीकर, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. आयोजित बैठकी मध्ये महाराष्ट्रामध्ये किसान मोर्चा आघाडीचे संघटन बळकट करण्याच्या उद्देशाने भाजपाचे मराठवाडा माजी संघटन मंत्री सुधाकर भोयर यांची किसान मोर्चा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी प्रदेश कार्यकारणी मध्ये सरचिटनिस पदी निवड करुन आयोजित कार्यक्रमात सत्कार केला.
त्यांच्या या निवडी बद्दल खा. प्रताप पाटील चिखलीकर, भाजपा नांदेड जिल्हा अध्यक्ष व्यंकट पाटील गोजेगावकर, आ.राम पाटील रातोळीकर, आ. राजेश पवार, आ. तुषार राठोड, जिल्हा सरचिटणिस श्रावण पाटील भिलवंडे, गंगाधर जोशी, प्रदेश कार्यकारणी सदस्य सौ संध्याताई राठोड, प्रफुल्ल राठोड, धरमसिंग राठोड, जिल्हा उपाध्यक्ष अशोक नेम्मानिवार, ता. अध्यक्ष संदिप केंद्रे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, भाजपा शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार, उपनगराध्यक्ष व्यंकट नेम्मानिवार, सुमित राठोड, किनवट चे मानकरी मुकुंदराव नारायणराव नेम्मानिवार आदीसह नांदेड जिल्ह्यातील भाजपाचे अनेक पदाधिका-यांनी सुधाकर भोयर यांना भ्रमणध्द्वनी वरुन निवडी बद्दल शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें