ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

गुरुवार, 9 जुलाई 2020

भाजपा नेते सुधाकर भोयर यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून फेरनिवड



रशीद फाजलानी प्रतिनिधी 
किनवट:-भारतीय जनता पक्षाची कार्यकारणी 3 जुलौ 2020 रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहिर केली. या नवनिर्वाचीत कार्यकारणीत किनवट माहूर विधानसभा मतदार संघातील भाजपा नेते सुधाकर भोयर  यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून  फेरनिवड झाली आहे.
पद असो अथवा नसो कार्यकर्त्यांचे प्रश्न कोणताही असो ते मार्गी लावण्यासाठी नेहमी आग्रही असणारे सुधाकर भोयर यांची १९८१ पासून विद्यार्थी जीवनातून विद्यार्थी परिषद च्या माध्यमातून भाजपाच्या विचाराशी नाळ जुळली.त्या नंतर १९८७ ते २०१४ पर्यंत पूर्ण वेळ संघटन मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.ते महाराष्ट्राचे विद्यार्थी परिषद प्रदेश सरचिटणीस,मराठवाड्या चे संघटन मंत्री होते. दरम्यान औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, या जिल्ह्यात मराठवाडा मंत्री असताना पक्ष वाढी साठी त्यांनी पूर्ण वेळ या  जिल्ह्यात काम केलं.पक्ष मोठा होत असतना अनेक उपऱ्यानी फायदा घेतला.अनेक नेते पक्षात आले आणि गेले ही,परंतु सुधाकर भोयर यांनी पक्षाची साथ सोडली नाही. १९९४ साली त्यांनी किनवट माहूर मतदार संघात निवडणूक लढविण्याची त्यांनी इच्छा केली असता पक्षा कडून विधान सभेची उमेदवारी नाकारण्यात आले.नंतर २००४ साली मराठवाड्यातील पहिल्या यादीत त्यांचे नाव आले होते,मात्र रातो रात ते बदलण्यात आले.२०१४ मध्ये ही उमेदवारी देण्याचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्या कडून आश्वासन मिळाले होते,मात्र पुन्हा पक्षा नी बाहेर च्या उमेदवाराला आयात केले व त्यांना संधी दिली नाही.परिणामी २००४,व २०१४ मध्ये पक्षाच्या उमेदवाराचे अनामत रक्कम ही जप्त झाले होते.गत विधान सभा निवडणुकीत ही त्यांनी पक्षाचे इमानदारी ने काम केले.त्यांनी पक्ष वाढी साठी नेहमी काम केले मात्र त्यांना पक्षा कडून फार काहीं महत्वाची पदे मिळाली नाही.सुधाकर भोयर यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून  फेर निवड झाली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें