ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

गुरुवार, 9 जुलाई 2020

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातून नांदेड जिल्ह्यासाठी 80 व्हेंटिलेटर उपलब्ध


प्रतिनिधि  रशीद फाजलानी
   
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनेच घेतली नांदेड करांच्या आरोग्याची काळजी

नांदेड : जिल्ह्यात कोरोणाचा वाढता संसर्ग लक्षात घेता गंभीर लक्षण असणाऱ्या रुग्णांना कोरोना मुक्त करण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या व्हेंटिलेटरची नांदेड जिल्ह्यात मोठी कमतरता होती. त्यामुळे नांदेड येथील शासकीय रुग्णालयासह जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावेत यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती केली होती. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने नांदेड जिल्ह्यासाठी तब्बल 80 व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला आणि नांदेड येथील विरोधकांना जे गेल्या तीस वर्षात जमले नाही ते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अवघ्या काही महिन्यात करून दाखविले आहे.
नांदेड जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे .सद्य परिस्थितीत नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाचशेच्या पुढे आहे. देशातील कोणत्याही राज्यात कोरोना चा इतका संसर्ग वाढला नाही जितका संसर्ग महाराष्ट्रात वाढला आहे. महाराष्ट्रातील दळभद्री महा आघाडीच्या सरकारमुळे राज्यातील जनता कोरोनाच्या घशात ढकलली गेली. राज्यात आरोग्यसेवा सक्षम नसताना मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडून जनतेच्या रक्षणासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. किंबहुना राज्यात शासकीय रुग्णालयात आवश्यक तेवढय प्रमाणात  व्हेंटिलेटरही उपलब्ध नव्हते. यात नांदेड जिल्हा अपवाद नाही. नांदेड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात बोटावर मोजता येतील इतकेच व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. त्यामुळे अती गंभीर लक्षण असणाऱ्या करोना बाधित रुग्णांना बरे करण्यासाठी आरोग्य विभागा समोर मोठ्या अडचणी होत्या. ज्यांनी नांदेडच्या जनतेच्या बळावर राज्यातील अनेक सन्मानाची पद भूषविली सत्ता भोगली त्यांनी केवळ शासकीय इमारती बांधल्या मात्र त्यात आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध केल्या नाहीत. केवळ देखाव्याचे जुमाले उभारण्याचे काम करणाऱ्या नेत्यांनी  नांदेडच्या जनतेच्या रक्षणासाठी आत्यवश्यक असणारे  व्हेंटिलेटर उपलब्ध केले नव्हते.  परंतु ज्या जनतेने आपल्याला विश्वासाने निवडून दिले. ज्या जनतेने आपल्यावर विश्वास टाकला त्या जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यात व्हेंटिलेटरची कमतरता असल्याची बाब लक्षात येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संबंधित विभागाकडे व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत पाठपुरावा केला. अवघ्या महिनाभराच्या पाठपुरावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेड जिल्ह्यासाठी तब्बल 80 लिटर मंजूर केले आहेत .
 जिल्ह्यातील आरोग्य विभागात एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर उपलब्ध होण्याची ही ऐतिहासिक घटना आहे . नांदेड जिल्ह्यातील कोरोणा बाधित रुग्ण मृत्युमुखी पडू नये,  कोरोणाचा संसर्ग लवकरात लवकर आटोक्यात आणता यावा , कोरोना मुक्त भारत झाल्यानंतरही ज्या ज्या रुग्णांना जेव्हा-जेव्हा व्हेंटिलेटरची गरज भासेल तेव्हा तेव्हा त्यांना वेंटीलेटर सहज उपलब्ध व्हावेत, नागरिकांची आरोग्य सुखकर असावे यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला होता. खा. चिखलीकर यांच्या पाठपुराव्याला यश आले असून नांदेड जिल्ह्यात तब्बल 80 व्हेंटिलेटर उपलब्ध झाल्याने आता आरोग्य विभागाला ही मोठा दिलासा मिळाला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें