ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

शुक्रवार, 17 जुलाई 2020

सारखानी येथील नोमान फाजलानी बारावी परीक्षेत प्रथम....


प्रतिनिधी,रशीद फाजलानी 

बुलढाणा येथील स्थानिक सहकार विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज मधून बारावी च्या विध्यार्थ्यांना  उत्कृष्ट यश मिळविले आहे. उल्लेखनी बाब म्हणजे आदिवासी व डोंगराळ भागातील सारखाणी गावातील नोमान सलीम फाजलानी हा 2020 च्या बारावी सायन्स परीक्षा देऊन 86. 46%  गुण प्राप्त करून त्याच्या कॉलेज मधून प्रथम क्रमांक पटकवून त्याच्या शिक्षण संस्था सह सारखानी क्षेत्रात मान उंचावली आहे.
प्राथमिक शिक्षण आदिवासी व दुर्बल क्षेत्रात त्याचे शिक्षण झाले आहे. त्याचे वडील सलीम अजीजभाई फाजलानी यांनी नोमान ची शिक्षणाची आवड जिद्द ओळखून त्यांनी त्याला बुलढाणा येथील नामवंत संस्थेत प्रवेश दिला. नोमानने आई ,  वडिलांच्या शिक्षणासाठी करत असलेल्या प्रयत्नाला प्रतिसाद देत अफाट मेहनत घेत हे यश सम्पादन केले आहे.
नोमान फाजलानी यांना  मराठवाडा न्यूज ने पुढील शिक्षणाबद्दल विचारले असता तो म्हणाला मला खूप खूप अभ्यास करून वैधकीय किंवा प्रशासकीय क्षेत्रात करिअर करायचे आहे.ते एवढ्याच साठी की मी अतिशय ग्रामीण भागात राहतो तर इथे लहान वयापासून मि पहात आहे  अनेक सर्व सामन्याच्या अनेक समस्या आहेत. आरोग्यक्षेत्र,  व अनेक प्रशासकीय समस्या आहेत या समस्या वर मी खूप दुःखी होऊन हे दूर करण्यासाठी मी माझे ध्येय ठेवले आहे. असे  ते म्हणाले. 
त्याने या श्रेया चे मानकरी म्हणुन आई,  वडील,  संस्थाचालकवर्ग,  प्राचार्य , प्राध्यापकवर्ग,  याना दिले आहे.
नोमान फाजलानी यांनी घेतलेल्या भरारी चा सर्वच स्तरावर कौतुक केले जात आहे तर अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत, मराठवाडा न्यूज ने पन त्याचे अभिनंदन करून पुढील त्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें