कोरोना लॉकडाऊन काळातील वीज बिल ग्राहकांनी संभ्रमात राहूनये बिल अचूक मिळतील - महावितरण
प्रतिनिधी , किनवट /सारखणी . रशीद फाजलानी,देवीदास ढगे
गेल्या काही महिन्या पासून कोरोना नावाच्या विषाणूने आपल्या ही देशावर संकटाचे थैमान घातले आहे.अशा प्रकारचे संकट इतिहासात कधी आले नाही.लॉकडाऊन मुळे प्रत्यकास घरात राहणे बधंनकारक होते.त्या मुळे नियमित कामे करून कोणत्याही प्रकारच्या सेवा व्यवस्थित मिळाल्या नाही.त्यामुळे प्रत्यक जडण घडीत बदल झाले. त्या मुळे सर्व सामान्य माणूस आर्थिक संकटात तर आलाच त्याच बरोबर अनेक सेवा देणाऱ्या कंपन्यांवर संभ्रमात आहे.
देशभर कडक लॉकडाऊन असल्याने त्या काळातील महावितरण ने त्या महिन्यातील मीटर रिडींग घेता न आल्याने ग्राहकांना सरासरी वीजबिल पाठविण्यात आलेले आहे.काही ग्राहकांनी मोबाईल ऍप द्वारे रिडींग पाठविणाऱ्या ग्राहकांना बरोबर वीजबिल पाठविण्यात आले आहे.मात्र एप्रिल व में महिन्यातील चुकीचे बिल आलेल्या सर्वांना त्या सर्वांचे वीजबिल दुरुस्त होऊन देण्यात येईल.कारण प्रत्यक्षात रिडिंग घेण्यात आली आहे.अचूक व प्रत्यक्षात वीज वापरानुसार येणार आहे.
सरासरी बिल ऋतू प्रमाणे वीज वापरली जाते या सर्व बाबीचा विचार करून वीजबिल पाठवली होती.या साठी सर्व ग्राहकांनी वीजबिलाच्या मागील बाजूस वजा देयकाची रक्कम या शीर्षकाखाली स्लॅब बेनिफिट अंतर्गत रक्कम वजावट (कमी )झाली आहे किंवा नाही हे पन तपासू शकतात.
सध्या महावितरण लॉकडाऊन शिथिलता मुळे जून महिण्यातील प्रतिबंध क्षेत्र वगळता इतर शिथिल ठिकाणी मीटरची रिडींग घेऊन वीजबिल देण्याचे काम जोरात सुरु आहे.तरी ग्राहकांनी कुठलीही काळजी करू नये.महावितरण नेहमी साठी आपल्या सुविधा साठी अधिकृत वीजबिल केंद्र किंवा घरबसल्या ऑनलाईन द्वारे चालू व थकीत वीजबिलाची रक्कम भरू शकतात. विशेष बाब म्हणजे किनवट तालुक्यातील जनते साठी किनवट येथील अधिकारी कर्मचारी हे शहरातील व प्रत्यक गावातील ग्राहकांना तत्पर सेवा कशी मिळेल या साठी
सन्माननीय ग्राहक ,
आपणास विनंती करण्यात येते की, जर आपल्या वीज बिल संदर्भात काही तक्रारी असल्यास आपण आपला अर्ज मीटर रिडींग चा फोटो, ग्राहक क्रमांक ई. श्री पातळे/ श्री ढगे , वरीष्ठ/कनिष्ट लिपिक महावितरण किनवट यांना मो.क्र. ९४०५४३६४२२ व ९७६३३४६१३१ वर वॉट्सअप करावे म्हणजे वीज बिल तक्रार निवारण लवकर होणार तसेच योग्य बिल असल्यास त्वरित बिल भरून महावितरण कम्पनिस सहकार्य करावे.
महावितरण किनवट घरगुती ग्राहकांना जून 2020 चे बिल कशा प्रकारे आकारले आहे हे पहाणे सुलभ व सोईस्कर होण्यासाठी महावितरने https //billcal.mahadiscom.in /consumerbill/ही लिंक उपलब्ध करून दिली आहे.त्या मुळे सर्व ग्राहकांनी कोणत्याही प्रकारच्या संभ्रमात न राहता खात्री करावी व महावितरण ला या काळात सहकार्य करावे असे अहवान महावितरण ने केले आहे..

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें