प्रतिनिधि नांदेड रशीद फाजलानी
अत्यावश्यक सुविधा देणारे महावितरण चे अधिकारी व कर्मचारी प्रशंसे पासून वंचित
भारतीय जनतेने घरात राहून देशसेवा करा. आपणास अखंडित सेवा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.महावितरण
आम्ही वीज सैनिक,
आज जे देशावर संकट आले आहे त्यात सर्वच विभागातील कर्मचारी जीव ओतून काम करत आहेत. प्रत्येकाचे कौतुक होत आहे पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार यांना शासनाने 50 लाखाचा विमा जाहीर केला त्याबद्दल शासनाचे आभार मानतो. कारण कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या साथीत कधी हा कुटुंबाचा वाली निघून जाईल हे सांगू शकत नाही, त्यामुळे त्याच्या जाण्याने ती दरीं कधीही भरून निघत नाही पण त्या 50 लाखाचा आधार तरी राहील.
पण आज या धावपळीत ज्याने सर्वाना घरी बसण्याची हिम्मत दिली, घरातील लाईट , फॅन, फ्रिज, ए. सी., टेलिव्हिजन, लॅपटॉप, कॉम्पुटर व मोबाईल अशी उपकरणे अखंडित सेवा देत चालू ठेवलीत त्या वीज सैनिकालच सर्व विसरलेत. वीज सैनिक बाहेर जाताना छाती ताणून कोणत्याही संकटाला न घाबरता बाहेर आपला जीव हातावर घेऊन फिरतो.कधी कुठे लाईनवर शहिद होईल ते सांगता येत नाही परंतु त्याला बाहेरून घरात येताना घाम फुटतो, घरात येताना सर्वात जास्त घाबरतो कारण बाहेर फिरताना कुठे स्पर्श झाला,कोणत्या पोलवर, कोणत्या रस्त्यावर, कुणाच्या घरात, कुणाच्या दारावर, कुठे कपड्यावरून तर संसर्ग विषाणू तर नाही आला? माझ्यामुळे घरातील कुणाला ही आईवडील, भाऊबहीण, पत्नी, मुले यांना तर लागण नाही होणार ना?
म्हणून या युद्धात काम करणाऱ्या प्रत्येक सैनिकांची तपासणी करणे महत्वाचे आहे. भले या वीज सैनिकाचे कुणी कौतुक करो या ना करो पण आम्ही आमची देशसेवा नेहमी चालूच ठेवत आहोत. काम करणाराला फक्त कौतुकाचे दोन शब्द मिळाले तर अजून संपूर्ण अंगात जोश निर्माण होऊन तो कसलेही काम करू शकतो. ज्याप्रमाणे या साथीत काम करणाऱ्याना 50 लाखाचा विमाकवच मिळाले त्याच प्रमाणे आम्हाला(वीज सैनिक ) देखील मिळावे जेणे करून मागील कुटुंबाची वाताहत होणार नाही. तरी शासन दरबारीं विनंती करतो की, आमची ही काळजी घ्या, आम्हालाही विमाकवच लागू करा.
महावितरण, महापारेषण, महानिर्मिती मधील सर्व कर्मचारी (लाईनस्टाफ ), ऑपरेटर, अभियंते यांना 50 लाख विमाकवच देऊन कुटुंबं सुरक्षित करावे.लाईनवर मरण आल्यास त्याला 'शहीद' असे संबोधण्यात यावे आपल्या या निर्णयाचे सर्वांकडून स्वागत राहील व आपले आभारही मानतील. एकवेळ अवश्य विचार व्हावा.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें