सारखानी / नांदेड प्रतिनिधी देविदास ढगे
चौकोणात जिंदगी फसली...!*
किलबील ऐकायला येईना
वर्दळ समदी थंडावली..
चौकोणात जिंदगी फसली..
या वंगळ्या विषाणू पाई...!!
प्रत्येक क्षण पळत होता
सकाळ ते सांजेचा...
वेळच फूका वाटयचा तेव्हा
आपल्यांच्या वाटेचा...
वायफळ गप्पा वाटायच्या
त्या संसारातील उणे..
कट्यावरच्या बातांशीचे वाटे
काय आपुले देणे...?
भातुकलीही किर्र वाटे..
लोळत्या पोरांची..
वाटे व्दारे बंदच -हावी ..
शांती साठी घरांची...
आज कळाले चुकले थोडे
साधी राहणी मुकली...
चौकोणात जिंदगी फसली..
या वंगळ्या विषाणू पाई..!!
आज कळलं घर काय असतं
कळलं काय प्रपंच असतो..
घरी बसुन काय कळणार..?
कळलं आम्ही किती चुकतो..
गरजेपेक्षा जास्त कळले..
गरजेएवढेच समजले..
मेजवाणी पेक्षा घरचीच पानं
आज आवडत जिरवले...
खाता खाता मागील थोडी
आठवण ही हिरमुसली..
चौकोणात जिंदगी फसली
या वंगळ्या विषाणू पाई...!!
आज थोडा स्वार्थ लाजला
लाजला थोडा अभिमान..
कळले येणे सोबत नाही
कुठलीच दौलत अहो धनवान.
खरी दौलत ही सहवासाची..
समते,ममते, करूणत्वाची..
ठेवा आपूलकीचे देणे घेणे..
नाती-गोती न साथ नेणेची..
श्वासावर नच ताबा आपुला
जगण्या जीवे-जिव्हे आसुसली..
चौकोणात जिंदगी फसली..
या वंगळ्या विषाणू पाई...!!
फसली जिंदगी बेहत्तर झाले
कळली माय,बा.. अन पत्नी..
कळली महत्ता घरातल्यांची
कोण किती हो यत्नी.......!
थोडा विसावा हवाही होता
हवी होती थोडीशी सवड..
जाणीव होण्या जरा थांबणे
कळती न ईतरांची परवड..
करू लढाई स्वतः स्थिरावून
निसर्गाची आज नाराजी दिसली..
चौकोणात जिंदगी फसली..
या वंगळ्या विषाणू पाई...!!
*हृदयाक्षर ..(मिलींद)*
ReplyForward
|

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें