ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

शुक्रवार, 6 फ़रवरी 2026

प्रशासकीय इमारतीत दलालांना प्रतिबंध,तहसीलदार अभिजीत जगताप यांनी घेतला दबंग निर्णय. तहसील कार्यालयात खासगी दलाल व एजंट यांना प्रतिबंध नागरिकांनी थेट सेवा घेण्याचे तहसीलदार अभिजीत जगताप यांचे आवाहन.

प्रशासकीय इमारतीत दलालांना प्रतिबंध,तहसीलदार अभिजीत जगताप यांनी घेतला दबंग निर्णय.

तहसील कार्यालयात खासगी दलाल व एजंट यांना प्रतिबंध  नागरिकांनी थेट सेवा घेण्याचे तहसीलदार अभिजीत जगताप यांचे आवाहन.



श्रीक्षेत्र माहूर 

माहूर शहरातील प्रशासकीय इमारतीत असलेल्या तहसील कार्यालयात रक्कम घेऊन नागरिकांची कामे करणाऱ्या गोरगरिबांना लुबाडणाऱ्या दलालांना तहसीलदार अभिजीत जगताप यांनी मुख्य गेटवर फलक लावून प्रतिबंध केला असून कार्यालय परिसरात दलाल आढळल्यास कार्यवाही करण्यात येईल असा कडक इशारा देऊन नागरिकांनी थेट कार्यालयाशी संपर्क साधून वेळेत कामे करून घेण्याचे आवाहन तहसीलदार अभीजित जगताप यांनी केले आहे.

तहसील कार्यालयाच्या आवारात नागरिकांची फसवणूक होऊ नये तसेच शासकीय कामकाजात पारदर्शकता राखण्यासाठी खासगी दलाल व एजंट यांना प्रतिबंध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तहसील कार्यालयातील सर्व शासकीय कामकाज हे संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत थेट केले जाते. कोणत्याही प्रकारचे काम करून देण्याचे आमिष दाखवणारे दलाल, एजंट किंवा मध्यस्थ यांना कार्यालयीन परिसरात फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. अशा व्यक्ती आढळून आल्यास त्यांच्यावर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

नागरिकांनी कोणत्याही दलाल किंवा एजंट यांना पैसे देऊ नयेत. कामासाठी तहसील कार्यालयातील मदत केंद्र किंवा अधिकृत क्रमांक 02460_268521संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार अभिजित जगताप यांच्या मार्फत करण्यात आले आहे. दलाल किंवा एजंट संदर्भात तक्रार असल्यास नागरिकांनी त्वरित तहसील कार्यालय प्रशासनाकडे कळवावी.

हा निर्णय नागरिकांच्या हितासाठी व शासकीय कामकाज अधिक सुलभ व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने घेण्यात आला आहे.

नागरिकांना सर्व सुविधा त्यांच्या गावातच मिळाव्या या हेतूने प्रत्येक नगरपंचायत ला ऑनलाइन शी जोडण्यात आले असून शहरांमध्ये सुविधा केंद्र मार्फत सर्व कामे ऑनलाईन होत असतात तसेच तहसील कार्यालयातही सर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्यात येत असून नागरिकांनी कुठल्याही दलालाशी संपर्क करू नये कुठल्याही आमिषांना बळी न पडता थेट कार्यालयाशी संपर्क साधून वेळेत कामे पूर्ण करून घ्यावी 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें