ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

बुधवार, 8 अक्टूबर 2025

उबाठा कडून ढोल बजावो आंदोलन, ज्यतिबा दादा खराटे यांच्या नेतृत्वात आंदोलन.

उबाठा कडून ढोल बजावो आंदोलन, ज्यतिबा दादा खराटे यांच्या नेतृत्वात आंदोलन.




किनवट शहरातील जिजामाता चौकात आज दिनाक ८ ऑक्टोबर रोजी ११ वाजता 'ढोल बजावो आंदोलन' करण्यात आले. हे आंदोलन अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी करण्यात आले असून, या आंदोलनात शिवसेनेचे उपनेते व संपर्कप्रमुख बबनराव थोरात तसेच नांदेड जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांची प्रमुख उपस्थिती होती अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, त्यांना त्वरित थेट आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी, पंजाबच्या धर्तीवर प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान, पीकविमा निकषांमध्ये सवलत आणि पशुधन नुकसानीची तात्काळ भरपाई देण्यात यावी, अश्या घोषणा देत मागनीचे निवेदन किनवट तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार शेख रफिक यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व बबनराव थोरात आणि ज्योतिबा खराटे यांनी केले. यावेळी किनवट-माहूर विधानसभा प्रमुख अनिल रुणवाल, उपजिल्हा प्रमुख उमेश जाधव, युवा सेना जिल्हा प्रमुख यश खराटे, किनवट तालुका प्रमुख मारोती दिवसे पाटील माहूर तालुका प्रमुख जितू चोले,प्रशांत कोरडे, अतुल दर्शनवार, किशोर बोलेनवार, प्रमोद केंद्रे, सदानंद शिंदे,शिवम देवकते, बजरंग बडगुरे,रवींद्र जाधव, तसेच शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें