ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

सोमवार, 13 अक्टूबर 2025

देवा भाऊ मुळे विदेशात मृत झालेल्या तरुणाचा मृतदेह आला मायदेशी आमदार भीमराव केराम व अनुसूचित जनजाती आयोगाचे वरिष्ठ अन्वेषक गोवर्धन मुंडे यांच्या प्रयत्नांना यश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपाने परराष्ट्र मंत्रालयाकडून तातडीने कार्यवाही.


संवेदनशील देवा भाऊ मुळे विदेशात मृत झालेल्या तरुणाचा मृतदेह आला मायदेशी

आमदार भीमराव केराम व अनुसूचित जनजाती आयोगाचे वरिष्ठ अन्वेषक गोवर्धन मुंडे यांच्या प्रयत्नांना यश.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपाने परराष्ट्र मंत्रालयाकडून तातडीने कार्यवाही.

प्रतिनिधी/ रशीद फाजलानी

किनवट तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखले जाणारे तेलंगणा सीमेवरील शेवटच्या टोकावरचे मौजे अप्पारावपेठ येथील एका गरीब शेतमजूर कुटुंबावर दुर्दैवी प्रसंग ओढावला. परिवारातील श्याम यादगिरी अंगरवार (वय 28) हा तरुण काही महिन्यांपूर्वी रोजगाराच्या शोधात विदेशात (दुबई येथे) गेला होता. परंतु तेथे तो आजारी पडला आणि उपचारा दरम्यान दिनांक 3 रोजी त्याचा मृत्यू झाला. व दिनांक 12 रोजी त्याचा मृतदेह मूळ गावी अप्पाराव पेठ या ठिकाणी पोहोचला. या घटनेने अप्पारावपेठ सह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

सदर घटनेची माहिती अप्पारावपेठ येथील माजी जि.प.सदस्य तथा किनवट भाजपाचे दक्षिण विभागाचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत अरंडकर यांना ही माहिती मिळताच त्यांनी तत्काळ आमदार भीमराव केराम साहेब यांच्याकडे धाव घेतली आणि मृतदेह मायदेशी आणण्यासाठी मदत मागितली. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार भीमराव केराम यांनी तत्काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांना या संबंधी एसएमएस द्वारे या गरीब कुटुंबाच्या वेदनेची जाणीव करून दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत परराष्ट्र मंत्रालयाशी स्वतः संपर्क साधून आपल्या दिल्लीतील स्वीयसहायक मनोज मुंडे यांना तातडीने आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले.आणि या कामी अनुसूचित जनजाती आयोगाचे वरिष्ठ अन्वेषक गोवर्धन मुंडे यांना सतत जातीने लक्ष ठेवण्याचे सूचना दिले. तर दुसरीकडे नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी ही आवश्यक ती मदत व नांदेड ते या अप्पाराव पेठ ठिकाणी मृतदेह नेण्यासाठी ॲम्बुलन्सची व्यवस्था करून दिली.आणि समन्वय साधण्यासाठी निर्देश दिले.त्यांच्या या तातडीच्या हस्तक्षेपामुळे अवघ्या काही दिवसांत मृतदेह दुबईहून स्वदेशी जन्मभूमी आपारावपेठ येथे आनण्यात यश आले.या सर्व कामी लागणारे आर्थिक खर्च मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या माध्यमातून सावरला.

तर दुसरीकडे गोवर्धन मुंडे यांच्या सतत पाठपुरावा व परिस्थितीवर नियंत्रण ठेवल्यामुळे आठ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर श्याम अंगरवार यांचा पार्थिव शरीर १२ ऑक्टोबर रोजी त्यांच्या मूळ जन्मगावी अप्पारावपेठ येथे पोहोचला.गावातील सर्व समाजबांधव, नातेवाईक परिवार आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले. या वेळी ग्रामस्थांनी डोळ्यांत अश्रू आणि मनात कृतज्ञता घेऊन संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार भीमराव केराम, वनवासी कल्याणचे वरिष्ठ अन्वेषक गोवर्धन मुंडे यांचे आणि भाजपा तालुका अध्यक्ष सूर्यकांत अरंडकर यांचे येथील सरपंच अब्दुल रब सह गावकऱ्यांनी आभार मानले. या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील, तत्पर आणि लोकहितासाठी सदैव तयार असलेले नेते आहेत. त्यांच्या संवेदनशील कार्यपद्धती सोबत लोकाभिमुख आमदार भीमराव केराम यांच्या लोकसेवाभावी वृत्तीमुळे गरीब कुटुंबाला आपल्या मुलाच्या शेवटक्षणी चेहरा पाहता आला.गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “सरकार खरोखरच जनतेच्या सोबत आहे, हे या घटनेने सिद्ध झाले.” भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार भीमराव केराम अनुसूचित जनजाती आयोगाचे वरिष्ठ अन्वेषक व वनवासी कल्याणचे वरिष्ठ अन्वेषक गोवर्धन मुंडे व सूर्यकांत अरंडकर यांच्या या मानवी दृष्टिकोनातून केलेल्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले. कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री, लोकाभिमुख आमदार आणि संवेदनशील कार्यकर्ते आणि सरकार सोबत असलेले पदाधिकारी यांच्यामुळे गरीब कुटुंबाला न्याय आणि दिलासा मिळाला, हेच या घटनेचे खरे सार.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें