ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

सोमवार, 6 अक्टूबर 2025

महा आक्रोश रास्ता रोकोलां अभूतपूर्व प्रतिसाद शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करून कर्जमाफी करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन संपन्न

महा आक्रोश रास्ता रोकोलां अभूतपूर्व प्रतिसाद शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करून कर्जमाफी करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन संपन्न



सारखणी प्रतिनिधी.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी यासाठी मौजे सारखंनी येथे दी 6 रोजी तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी माहूर तालुक्यातील जवळपास सर्वच गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलन कर्त्याचे निवेदन सिंदखेड चे सपोनि रमेश जाधव यांनी स्वीकारले.

किनवट माहूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी सरकारचा जाहीर निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले जवळपास राष्ट्रीय महामार्गावर सारखणी येथे तीन तास रास्ता रोको करण्यात आला एपीआय रमेश जाधवर यांच्यामार्फत देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन सुद्धा देण्यात आला आहे, सोबतच उपोषणास बसलेले मंगेश साबळे यांचे शेतकऱ्यांसाठी जवळपास सात दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे त्यांचे सुद्धा निवेदन तहसीलदार साहेबांना एपीआय रमेश जाधव यांच्या मार्फत दिले रस्ता रोको ला अनेक शेतकऱ्यांनी संबोधित केले शेतकऱ्याला एकरी 50 हजार रुपये मदत तात्काळ जाहीर झाली पाहिजे शेतमजूर आहेत त्यांचे घर धान्य साठा वाहून गेले घरा पडझडं शेतमजूर झालेली आहे त्यांना सुद्धा 50 हजाराची मदत तात्काळ जाहीर झाली पाहिजे त्यानंतर शेतकऱ्याची कर्जमाफी त्वरित होऊन नवीन कर्ज शेतकऱ्याला उपलब्ध करून द्यावे प्रामुख्याने आंदोलनकर्त्याची हीच मागणी होती.

यावेळी त्रिभुवन सिंह ठाकुर शेतकरी संघटना यांची सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होती बजरंग वाढगुरे अमोल आडे बालाजी टनमने मिलिंद कांबळे सारखणी ईश्वर परेकार शेलू अरविंद कदम वायफनीकर शुभम शेंद्रे बालाजी गायकवाड अरुण राठोड रुपेश राठोड श्रीकांत कदम प्रकाश बंडेवार संजय सूर्यवंशी ऋषिकेश चौधरी वामन शेंडे तसेच असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते आयोजक पिंटू आशीर्वाद पाटील यांनी सर्वांचे आभार मानले रास्ता रोको आंदोलन दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळधने व सपोनी रमेश जाधवर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें