महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक व कृषी दिनानिमित्त सोशल आर्मी सारखणीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते, युवा उद्योजक शैलेश राठोड यांच्या संयोजनाने वृक्ष लागवड हा उपक्रम कुमारेश्वर बाबा इंग्लिश स्कुल सारखानी येथे राबविण्यात आला. आधुनिक यंत्रणा द्वारे वृक्षारोपण करून दोन तासांमध्ये 120 झाडे लागवड केलीत यामध्ये सोशल आर्मीचे जाबाज कार्यकर्ते यांनी आठ दिवसापासून परिश्रम घेतला युवा उद्योजक शैलेश राठोड यांच्यासोबत गावातील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल चव्हाण, सावन चव्हाण, विक्रम राठोड, बजरंग पवार, स्वप्नील पवार, राजदीप भोसले, अरविंद चव्हाण, व अधिक कार्यकर्ते परिश्रम घेतले सोशल आर्मीचे कार्यकर्ते स्वखर्चाने फळांची झाडे परिसरात व शाळेत लागवड करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
या प्रसंगी कुमारेश्वर बाबा इंग्लिश स्कूल चे सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. व विद्यार्थी वर्ग मोठ्या उत्साहित सहभाग नोंदविला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें