ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

रविवार, 29 जून 2025

एरियास वेळेत मिळण्यासाठी संजीव वानखेडे यांचे पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण. संघटनेचे अध्यक्ष झाले तेव्हापासून संजीव वानखेडे यांनी कर्मचाऱ्यांसाठी अनेकदा आपल्या जीवाचे रान करून लढा दिला आहे यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांचे भवितव्य सुधारले आहे.

एरियास वेळेत मिळण्यासाठी संजीव वानखेडे यांचे पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण.

संघटनेचे अध्यक्ष झाले तेव्हापासून संजीव वानखेडे यांनी कर्मचाऱ्यांसाठी अनेकदा आपल्या जीवाचे रान करून लढा दिला आहे यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांचे भवितव्य सुधारले आहे.



(सारखणी प्रतिनिधी) ग्रामपंचायत कार्यालयाचे माहे जून 2021 ते मार्च 2022 या 10 महिन्याच्या फरकाची रक्कम (एरियस) वेळेत देण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष संजीव अंबादास वानखेडे यांनी 27 जून रोजी गट विकास अधिकारी पंचायत समिती किनवट यांना निवेदन देऊन कळवले आहे. 

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे माहे जून 2021 ते मार्च 2022 या 10 महिन्याच्या फरकाची रक्कम (एरियास) रक्कम१,१९,२८,६५१ रूपये ग्रामपंचायत समिती किनवट येथे जिल्हा परिषद नांदेड कडून वर्ग करण्यात आली. परंतु आज घडीला एक महिना दहा दिवस लोटूनही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात आली नसल्याने महाराष्ट्र ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष संजीव अंबादास वानखेडे यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा उचलला आहे. एरियाची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे ,ही रक्कम तात्काळ कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी म्हणून दिनांक १ जुलै 2025 पासून पंचायत समिती कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने बे मुद्दत आमरण उपोषण नास बसणार असल्याचे पत्र संघटनेचे अध्यक्ष वानखेडे यांनी दिले आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे माहे जुलै , ऑगस्ट व सप्टेंबर 2024 चा भविष्य निर्वाह निधी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी जिल्हा परिषद नांदेड कडून रक्कम ५,३७,२१६ रुपये पंचायत समिती किनवट यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली परंतु भविष्य निर्वाह निधीची रक्कम अद्याप पर्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर आली नसल्याने कर्मचाऱ्यावर मोठा संकट निर्माण झाला आहे व कर्मचाऱ्यात रोज निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नळ योजनेची मोटर चालू बंद करण्यासाठी गावातील स्ट्रीट लाईट सुरु करण्यासाठी नळ योजनेची विहीर नाल्यालगत किंवा शेतामध्ये असल्याने गवतामधून जावे लागते सापापासून व इतर हिंसक प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी पायात लांब बुट ,पावसाळ्यात पाण्यापासून बचाव करण्यासाठी रेनकोट, मोटर चालू करताना विजेचा साप लागू नये म्हणून यासाठी बॅटरी साहित्य असलेले सुरक्षा किट कर्मचाऱ्यांना देऊन त्यांच्या जीवनाचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने संजीव अंबादास वानखेडे हे १ जुलै पासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ करणार आहेत. निवेदनावर संघटनेचे उपाध्यक्ष मारोती एरावार, सचिव अरविंद घुगे व कार्याध्यक्ष विठ्ठल कागणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. संजीव वानखेडे यांनी यापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आपल्या जीवाचे रान करून लढा दिला आहे त्यांच्या लढाईचे अनेक प्रसंग समोर आले आहेत व त्यांच्या लढ्यामधून अनेकांना मोठा फायदा झाला आहे व कर्मचाऱ्यांचे संकट दूर झाले आहे. त्यातूनच हा एक पाऊल त्यांनी पुढे टाकला आहे त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें