चतुर्थीच्या दिवशी चार लाखावर भाविकांनी घेतले श्री रेणुका मातेचे दर्शन.
जीवावर उदार होऊन भाविकांनी घेतले मातेचे दर्शन.
चतुर्थी च्या दिवशी श्री रेणुका मातेला नारंगी रंगाचे पैठणी महा वस्त्र अर्पण.
लाखो भाविक माहूरगडावर दाखल झाल्याने प्रशासनाचे सर्व विभाग हतबल.
बसेस पडल्या कमी पोलिसासह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी कमी पडल्याने मातेच्या भरोशावर झाले भाविकांचे दर्शन.
रस्ता अरुंद असल्याने ट्राफिक जाम सह पार्किंग झाल्या हाउसफुल्ल.
श्रीक्षेत्र माहूर
श्रीक्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरात नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी सकाळी सात वाजता मातेच्या वैदिक महापुजेस सुरुवात करण्यात आली त्यानंतर मातेला अलंकारासह नारंगी रांगाचे पैठणी महा वस्त्र अर्पण करून वेद पारायण सुरु करण्यात आले यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी संजय कान्नव विश्वस्थ पुजारी यांच्या उपस्थितीत दुर्गा सप्तशती शतचंडीपाठास हजारो भाविकांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.
दुपारी पायस नैवेद्य व आरती झाल्यानंतर छबीना मिरवणूक काढण्यात आली परिवार देवतांचे पूजन झाल्यानंतर भाविकासासाठी भगवान परशुराम मंदिर परिसरात महाप्रसाद महा अन्नदान सुरू करण्यात आले यानंतर मातेस पायस महानैवेद्य गाईचे तूप आणि केळी अर्पण करण्यात आला त्यानंतर महाआरती द्वारे दुपारचे धार्मिक कार्यक्रम सुरू करण्यात आले चतुर्थीच्या दिवशी माता दरबारात पिसा देव छत्रपती संभाजी नगर येथील श्री जगदंब म्युझिकल ग्रुप यांनी भजन सादर केले दहिसर येथील सौ दीपिका जोशी यांनी गायन सादर केले नरसी नायगाव जिल्हा नांदेड येथील गणेश हाके सौ सरस्वती कुमारी वीरा यांनी गायन सादर केले छत्रपती संभाजीनगर येथील शांती भूषण व सौ कल्याणी चारठाणकर यांनी गायन सादर केले पुणे येथील सौ भक्ती उदय पांडव यांनी बहारदार नृत्य सादर केले जालना येथील सौ भक्ती सुनील पवार यांनी गायन सादर केले पुणे येथील सौ अंबिका व श्रीपाद लिंबेकर यांनी गायन भक्तीमय वातावरणात सादर केले यावेळी हजारो भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.
श्री रेणुका माता मंदिरात चौथ्या माळेच्या दिवशी श्री रेणुका देवी संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्रीमती सुरेखा कोसमकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नांदेड सचिव मेघना कावली तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट उपाध्यक्ष रामकृष्ण मळघणे उपविभागीय पोलीस अधिकारी कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कुमारी का पूजन करण्यात आले यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी संजय कान्नव विनायकराव फांदाडे आशिष जोशी अरविंद देव दुर्गादास भोपी बालाजी जगत यांचे सह पुजारी भवानीदास भोपी राजू भोपी जहागीरदार शुभम भोपी ॲड उज्वल भोपी आनंद देव निलेश केदार गुरुजी मनोज बनसोडे यांचे सह सर्व मानकरी व्यवस्थापक योगेश साबळे स व्य नितीन गेडाम लिपिक अरविंद राठोड यांचे सह सर्व कर्मचारी भाविकांच्या उपस्थितीत कुमारिका पूजनासाठी मानकरी ठरलेल्या कुमारी खुशी गोपाल खापर्डे हिचे कुमारिका पूजन आनंदात पार पडले.
शहरातील टी पॉईंट येथे ज्योतिबा दादा खराटे यश खराटे मित्र मंडळ आणि कार्यकर्त्याकडून भाविकांना 51 हजार फळांचे वाटप करण्यात आले तरशहरातील श्री स्वामी अन्नछत्र मंडळात माधवराव रामराव एकलारे परिवाराकडून कै .अनुसयाबाई रामराव एकलारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ माधवराव रामराव एकलारे ज्ञानेश्वर रामराव एकलारे मोहित माधवराव एकलारे निखिल ज्ञानेश्वर एकलारे संजय चिमाजी मारवाडे यांचे कडून भाविकांसाठी सुरू करण्यात आलेल्या नऊ दिवशीय महाअन्नदानाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला तर सुजल ट्रेडिंग कंपनी येथे मित्र मंडळाकडून भाविकांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आले तर महाकाली मंदिर पायथ्याशी सूरकर बंधू यांच्याकडून मोठ्या प्रमाणात महाप्रसाद महाअन्नदानाची सुरुवात करण्यात आली.
माहूर नगरपंचायत चे नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी मुख्याधिकारी विवेक कांदे उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी संदीप गजलवाड देविदास जोंधळे विशाल ढोरे मजहर शेख गणेश जाधव विजय शिंदे यांचे सर्व कर्मचाऱ्यांनी पार्किंग पाणी सह दिशादर्शनासाठी मोलाचे कार्य केले तर पोलीस आरोग्य विभाग एसटी महामंडळ वन विभाग महसूल विभाग यांचे सह सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी दक्षता घेतली परंतु अचानक पणे लाखोच्या संख्येने भाविक दाखल झाल्याने एसटी बसेस कमी पडल्याने भाविकांना शंभर पेक्षा जास्त भाविकांना एका बस मध्ये कोंबून गडावर नेण्यात आल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली.


Best
जवाब देंहटाएं