आमदार भीमराव केराम यांनी पैनगंगा नदी पत्रावर बांधलेल्या घाटावर हजारो भाविकांनी गंगा स्नानाचा आनंद घेत केले अभिनंदन
श्रीक्षेत्र माहूर रशीद फाजलानी
श्री गणेश स्थापना आणि ऋषी पंचमी निमित्त लाखाच्या जवळपास भाविकांनी अचानकपणे गर्दी करत आमदार भीमराव केराम यांनी पवित्र पैनगंगा नदी पात्रावर बांधलेल्या स्नान घाटावर पवित्र गंगा स्नान करून निर्विघ्नपणे भक्ती भावात पूजा करून ऋषिपंचमी आनंदात साजरी केल्याने बांधलेल्या घाटामुळे आलेल्या लाखो भाविकांचे गंगा स्नान सुलभ झाल्याची प्रतिक्रिया दिल्याने आमदार भीमराव केराम यांनी त्यांचे सह शासनाचे नाव माहूरच्या इतिहासात नोंद केल्याची प्रतिक्रिया माहूर किनवट विधानसभा मतदारसंघातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.
ऋषी पंचमी निमित्त 108 उपनिषेदात जगातील सर्व ऋषी मुनी चे त्यागमय जीवन त्यांनी सांगितलेले मंत्र जप हे त्यांना साक्षात्कार झाल्यामुळे त्यांनी उपनिषेदात नोंदविले आहेत सर्व भौतिक सुखांचा त्याग करून विश्वाचे कल्याण होवो या उद्देशाने त्यांनी त्याग करुन जगाला ज्ञान दिले सर्व मानव जीवना सह जीवसृष्टी आनंदी राहावी मृत्यू पश्चात मोक्ष प्राप्ती व्हावी यासाठी उपनिषेदात सर्व नोंदी केल्या गेल्या आहेत ऋषीपंचमी निमित्त सप्तऋषी विश्वमित्र जमदग्नी भरद्वाज गौतम अत्री वशिष्ठ कश्यप या सात ऋषीनी सांगितल्याप्रमाणे आजच्या दिवशी ज्या शेतात बैलाद्वारे नांगरण्यात न आलेले तसेच आपोआप उगवलेले धान्य देवतांदूळ धान्य आजच्या व्रत उपवासाच्या दिवशी भक्षण करणे असा संदेश आहे आपापल्या ऋषींचे पूजन करणे गंगा स्नान करणे जप तप करणे त्यामुळे पापक्षालन होऊन पुण्यवृद्धी होते सनातन वैदिक धर्मात गोत्र संकल्पना आहे आपापल्या गौत्रांच्या ऋषीचे स्मरण करून गंगा स्नान जप तप दान केल्याने पुण्यवृद्धी होण्याची ही संकल्पना परंपरा आहे.
त्यामुळे पैनगंगा नदी पात्रावर लाखावर भाविकांनी व्रत ठेवत शेकडो किलोमीटर वरून येऊन पवित्र गंगा स्नान करत माहूर गडावरील श्री रेणुका माता श्री दत्त शिखर संस्थान श्री अनुसया माता संस्थान श्री महाकाली माता संस्थान भगवान परशुराम संस्थान देवदेवेश्वर संस्थान येथे जाऊन दर्शन घेत ऋषीपंचमी साजरी केली दरवर्षी गंगा स्नानासाठी पैनगंगा नदी पात्रावर भावीक येतात दि 8 रोजी अचानकपणे रात्री दोन वाजेपासून हजारोच्या संख्येने नदी पात्रावर आलेल्या भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून तहसीलदार किशोर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार कैलास जेठे हे शेकापूर केरोळी च्या पोलीस पाटील सह तसेच सपोनी शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसासह नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी मुख्याधिकारी विवेक कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी स्वच्छता दूत गणेश जाधव यांचे सह कर्मचाऱ्यांनी रात्रभर पाळत ठेवली होती.
पैनगंगा नदीपत्रावर पवित्र गंगा स्नानासाठी आलेल्या भाविकांना नेहमीच चिखलांमुळे घसरून पडणे ठेचा लागणे पाण्यात बुडण्याची भीती सह सरपटणाऱ्या प्राण्यांचा त्रास होत होता ही बाब लक्षात घेऊन कार्यसम्राट आमदार भीमराव केराम यांनी जुन्या पुलाच्या बाजूला गंगा स्नान घाट बांधल्याने भाविकांचे पवित्र गंगा स्नान पूजा विधि कार्य अनंदात निर्विघ्न पार पडल्याने भाविक आमदार भीमराव केराम यांचे सह उत्कृष्ट बांधकाम कंत्राटदार गणेश इंटरप्राईजेस यांना धन्यवाद देऊन त्यांचे अभिनंदन करत होते...


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें