ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

शुक्रवार, 6 सितंबर 2024

विक्रीसाठी महाराष्ट्रात प्रतीबंध करण्यात आलेल्या आणि बारमाही विक्री चालू असलेल्या सुगंधी गुटक्याची वाहतूक करणारे वाहन किनवट पोलीसांनी केले जप्त.

 

किनवट/प्रतिनिधी- विक्रीसाठी महाराष्ट्रात प्रतीबंध करण्यात आलेल्या आणि बारमाही विक्री चालू असलेल्या सुगंधी गुटक्याची वाहतूक करणारी एम.एच.२६-सी.एच.१४४३ महिन्द्रा पीकप गाडी किनवट पोलीसांनी बस स्थानक दरम्यान आज पहाटे मुद्देमालासह धरली. विशेष बाब म्हणजे गाडी धरण्यासाठी सज्ज असलेल्या पोलीसांच्या हाती गाडी चालक लागला की पसार झाला माहिती प्राप्त होऊ शकली नाही. हिमायतनगरातील उत्पादीत सुगंधी गुटखा हा किनवट मार्गे सारखणीतील एका बहूचर्चित व्यापार्‍यांच्या घरी साठेबाजी करण्यासाठी जात असतांना ही धाडशी कारवाई करण्यात आली. दर आठवड्याला हा गुटका पुरवला जातो अशी चर्चा आहे. फरार चालकामुळे गाडी मालकापर्यंत पोहोचण्यासाठी पोलीसांना आरटीओंचा आधार घ्यावा लागणार काय ? असा प्रश्न पडते.

      किनवट पोलीसांनी आज (६ सप्टेंबर) पहाटे किनवट बसस्थानक दरम्यान सुगंधी गुटखा वाहतूक करणारी महिंन्द्रा पिकप गाडी मुद्देमालासह धरली. त्यात जवळपास 32 पोते ज्याची किंमत 13 लक्ष 38 हजार रुपये तसेच 7 लक्ष रुपयाच्या गाडीसह 20 लाख 38 हजार रुपयाचे मुद्देमाल असल्याचे पोलीस सूत्र सांगतात तशी पोलीसांची गुटखा प्रती ही पहिली धाडशी कारवाई म्हणावी लागेल. गाडीचालक हा पोलीसांच्या गराड्यातून पसार होतो. याबद्दल मात्र चर्चेला उधान आल्यास नवल वाटू नये. हा फरार चालक आरोपी नामे शेख वसीम शेख रजाक राहणार हिमायतनगर फरार असल्यामुळे तिथपर्यंत पोहोचण्याचे पोलीसांसमोर आव्हान असणार आहे. 

     प्रतिबंधीत सुगंधी गुटखा हिमायतनगरातच निर्माण केल्या जातो की साठेबाजी करुन पुरवठा केला जातो ? सारखणी येथिल बहूचर्चीत व्यापार्‍यांच्या घरी राजरोसपणे साठवणूक केली जाते. किरकोळ विक्रीसाठी तेथून किनवट तालुक्यातील विशिष्ठ दुकानचालकांकडे पाठवला जातो. आणि विशेष करुन 

एम.एच.२६-सी.एच.१४४३ क्रमांकाच्या याच महिन्द्रा पिकप गाडीने दर आठवड्याला बारमाही गुटका वाहतूक होत असल्याचे ऐकायला मिळते. बहूचर्चीत असलेल्या उत्पादीत गुटक्याची कल्पना कदाचित हिमायतनगर पोलीसांना नसेल. किनवटहून सारखणीकडे वाहतूक होणार्‍या गुटक्याची किनवट पोलीसांना खबर नसेल. परंतू राजरोसपणे घरात साठेबाजी करुन किरकोळ व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍याची सिंदखेड पोलीसांना जराही चाहूल नसेल काय ? कायद्याने प्रतीबंधीत असलेल्या गुटक्याला मग नेमके कोणाचे संरक्षण म्हणायचे ? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें