राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या, गाव तिथे बुथ व तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी घरोघरी पोहचण्यासाठी प्रयत्न करा- माजी आमदार प्रदीप नाईक
सारखणी प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या, गाव तिथे बुथ व तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी घरोघरी पोहचण्यासाठी माजी आमदार प्रदीपजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या अभियानाला किनवट माहुर विधानसभा मतदान संघातील गोकुंदा जिल्हा परिषद सर्कल मधे आज दिनांक 27/08/2024 मंगळवार रोजी सकाळी. 9: वाजता शेनीवारपेठ व मदनापुर या गावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी गावातील लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी गेले असता गावातील प्रतीष्ठीत मंडळी,युवक, मंडळीनी भर भरून प्रतिसाद दिला, यावेळी मान्यवरांनी सखोल आसे मार्गदर्शन करुन यत्या निवडणुकीत सर्वांनी तन मन धणानी नाईक साहेबांच्या पाठीमागे उभे राहावे आसे आवाहन केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ,बुथ कमिटी तालुका अध्यक्ष प्रवीण अण्णा म्याकलवार,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राहुल भाऊ नाईक,राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष बालाजी दादा बामणे, मनोहर श्रीरामे, बबलु आडे,व गावातील प्रतिष्ठात नागरिक, व युवक मंडळी, तसेच सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते..


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें