ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

शनिवार, 25 मई 2024

माहूर तालुक्यातील सिंदखेड फीडर अंतर्गत येणाऱ्या करंजी, सेलू,लोकरवाडी, सिंदखेड, सारखणी, वायफानी, भगवती , दहेली , दहेलीतांडा , दुंद्रा, आदी गावातील शेतकऱ्यांचे उभी पीके वाळू लागली

माहूर तालुक्यातील सिंदखेड फीडर अंतर्गत येणाऱ्या करंजी, सेलू,लोकरवाडी, सिंदखेड, सारखणी, वायफानी, भगवती , दहेली , दहेलीतांडा , दुंद्रा, आदी गावातील शेतकऱ्यांचे उभी पीके वाळू लागली 


सारखणी प्रतिनिधी रशीद फाजलानी

माहूर तालुक्यातील सिंदखेड फीडर अंतर्गत येणाऱ्या करंजी, सेलू,लोकरवाडी, सिंदखेड, सारखणी, वायफानी, भगवती , दहेली , दहेलीतांडा , दुंद्रा, आदी गावातील शेतकऱ्यांचे उभे पीक वाळून चाललेत, महावितरण चे अधिकारी झोपेत आहेत. एकही लाइनमेन काम करण्यास तयार नाही. कायमस्वरूपी फॉल्ट निघत नाही. त्यांच्या हाताखाली ठेवलेले माणसे थातूरमातुर कामासाठी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत आहे. शेतकऱ्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून उभ्या पिकांसाठी खांब्यावर चढव लागत आहे. त्यांच्या जीवित्वाची जबाबदारी महावितरण घेणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वायफनी पुनर्वसित गावठाण अन्तर्गत झालेल्या महावितरण च्या बोगस कामांची चौकशी व्हावी अशी मागणी-अरविंद पाटील यांनी केली आहे,तर शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याची चेतावणी वायफाय येथील - त्रिशूल पाटील यांनी दिली आहे.

2 टिप्‍पणियां: