ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

शुक्रवार, 17 मई 2024

जंगलातून बनवला पांदण रस्ता तक्रारी होऊनही वन विभागाने कारवाई न केल्याने नागरिकांनी दिले निवेदन.


जंगलातून बनवला पांदण रस्ता तक्रारी होऊनही वन विभागाने कारवाई न केल्याने नागरिकांनी दिले निवेदन.

सागवानी गैरी झाडांची अवैधरित्या कत्तल गौण खनिजाची चोरी वन हद्दीच्या खुणा केल्या गायब दत्त मांजरीच्या सरपंच पतींचा प्रताप

श्रीक्षेत्र माहूर

माहूर तालुक्यातील मौजे दत्तमांजरी आमदार भीमराव केराम यांच्या निधीतून सुरु असलेला पांदन रस्ता वन विभागाच्या मालकीच्या जागेतून विना परवानगी सागवानी गैरी झाडांची अवैध कत्तल करून गौण खनिजा चे अवैधरित्या उत्खनन करून त्या रस्त्यावर वापर करत असल्याने सदर रस्त्याचे काम तात्काळ थांबवून जंगलाची व अनेक सागवानसह मौल्यवान लाकडांची तोड तसेच वन हद्दीच्या खुणा गायब करून वन जमी नीची नासधूस करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावे यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांना मौजे दत्त मांजरी येथील मनोज कीर्तने साहेबराव वाघमारे दयाळू जाधव बंडू चव्हाण यांनी निवेदन दिले आहे.

 मौजे दत्तमांजरी ता. माहूर येथील मातोश्री ग्रामसमृद्धी योजना अंतर्गत आमदार भीमराव केराम यांनी दिलेल्या निधीतून शेतपांदन रस्ता मंजूर आहे. हा रस्ता पंचायत समिती माहूर मार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून करणे चालू आहे. हा रस्ता एक किलोमीटरचा असून बळीराम चंदू पवार यांचे शेतापर्यत प्रस्तावित आहे. 

               जुना पांदन वहिवाटीचा रस्ता हा फक्त अंदाजे 500 मीटर आहे. परंतु 24,00,000/- रु. खर्च करून शासनाची फसवणूक करण्यात येत आहे. कारण 500 मीटर नंतर वन विभागाच्या मालकीच्या जमिनीची हद्द आहे. ती वनजमीन आज रोजी विना परवानगी खोदकाम करून ठेवली आहे. सदर जमीन ही नकाशा प्रमाणे पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. तसेच अनेक गैरी व सागवान वृक्ष जेसीबीव्दारे काढून त्या झाडांची परस्पर विल्हेवाट लावली आहे. याबद्दल सर्व संबंधितांना अर्जदारांनी चोरी होत असताना व्हाट्सअप वर माहिती कळविली होती परंतु याची कोणीही दखल घेतली नाही तसेच माहूर ते किनवट जाणारा राष्ट्रीय महामार्गचे मालवाडा घाटातील काम वनविभागाने रोखले होते त्याच धर्तीवर सदरील काम तात्काळ का रोखले नाही असा प्रश्नही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे

           सदर रस्ता हा वन जमिनीतून जात असल्याने त्वरित थांबवावा व जंगलातील झाडे तोडून वनजमिनीची नासधूस करणाऱ्या दत्तमांजरी येथील सरपंचाचा पती व जेसीबी धारक मालक व संबधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे ही अशी विनंती निवेदनात करण्यात आली असून काम तात्काळ न थांबविल्यास आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात मनोज कीर्तने साहेबराव वाघमारे दयाळू जाधव बंडू चव्हाण यांनी दिला आहे निवेदनाच्या प्रती ईमेलवरून जिल्हाधिकारी नांदेड उपवनसंरक्षक नांदेड सहाय्यक उपवनसंरक्षक किनवट यांना तात्काळ पाठविण्यात आल्या आहेत...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें