किनवट शहराच्या लगत पैनगंगा नदी व नाले वाहत असल्याने या भागात ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैध रेती तस्करी चोरट्या मार्गाने होत असल्याच्या गोनीय माहितीवरून दिनांक 21.05.2024 रोजी रात्री मौ.घोटी येथील पैंनगंगा नदीपात्रात रात्री 3 च्या दरम्यान अवैध रेती उत्खनन/वाहतूक करतांनाचे एक ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालय किनवट येथे पुढील कार्यवाहीसाठी लावले आहे.
तलाठी गौतम पांढरे,आदिनाथ डुकरे, मेघश्याम सांगविकर यांच्या पथकाने हि कार्यवाही केली सदर कारवाई सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली, तहसीलदार चौंडेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईने अवैध रेती तस्करी करणाऱ्या तस्करांचे धाबे दणाणले आहे. विशेष बाब म्हणजे गौतम पांढरे तलाठी यांच्या पथकाने मागील चार वर्षात टिप्पर, ट्रॅक्टर सह अनेक वाहने जप्त करून मोलाची कामगिरी केली आहे ,त्यांच्या या धाडस कारवाईने महसूल प्रशासनात त्यांच्या पथकाची प्रशंशा केली जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें