ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

बुधवार, 20 सितंबर 2023

श्रीगणेश चतुर्थी व ईद ए मिलाद शांतेत साजरे करा कायदा हातात घेतल्यास कुणाची गय केली जाणार नाही. स.पो.नी. सुशांत किनगे. सिंदखेड पोलिसांच्या अनेक ठिकाणी शांतता कमिटी च्या बेठका तर पोलीसांचे पथसंचलन करून जनतेला जागरूक करण्याचे प्रयत्न.
















श्रीगणेश चतुर्थी व ईद ए मिलाद शांतेत साजरे करा कायदा हातात घेतल्यास कुणाची गय केली जाणार नाही. स.पो.नी. सुशांत किनगे. सिंदखेड पोलिसांच्या अनेक ठिकाणी शांतता कमिटी च्या बेठका तर पोलीसांचे पथसंचलन करून जनतेला जागरूक करण्याचे प्रयत्न. 

सारखनी प्रतिनिधी रशीद फाजलानी 

मागील काही दिवसाचा ईतिहास पाहिला तर किरकोळ कारणा वरून जाळ पोळीच्या घटना होवुन काहींना आपले जिव गमवावे लागले आहे.अश्या काही घटना नांदेड जिल्यात घडु नये या साठी नांदेड पोलिस बल सु सज्ज असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सप्टेंबर महिन्यात श्रीगणेश चतुर्थी व ईद ए मिलाद हे दोन प्रमुख सन होवु घातले आहे म्हणून विषेश पोलीस उप महानिरीक्षक  शशीकांत महावरकर श्री कृष्ण  प्रकाश कोकाटे  जिल्‍हा पोलीस अधीक्षक नांदेड,खंडेराव धरने ,अप्‍पर पोलीस अधीक्षक भोकर हे संपूर्ण जिल्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या सर्वांच्या मार्ग दर्शनाखाली सिंदखेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत किनगे हे काम करत असुन सिंदखेड पोलिस ठाने हद्दीतील सारखनी,वाई बाजार,सह अनेक गावात गणेश मंडळ, ग्रामस्थ व व्यापार्यां सोबत शांतता कमिटी च्या बेठका  घेतल्या जात आहेत तर पोलिस ठाने हद्दीत पथसंचलन करून जनतेला जागरूक करण्याचे प्रयत्न सिंदखेड पोलिस करीत असल्याचे दिसुन येत आहे.  दोन्ही समाजाला सोबत घेऊन कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास त्याचे परिणाम काय होतात ते या बैठकीत जनतेला स्पष्ट पने दाखवले जात आहेत. येवढे करून जर कुणी कायदा हातात घेवुन जातीय तेड निर्माण केल्यास त्याची गय केली जाणार नाही याची सर्वानी खबरदारी घ्यावी असे आव्हान सिंदखेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत किनगे यांनी केले आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून जनता सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीसांना प्रतीसाद देत असुन मोठ्या प्रमाणात पोलीसांना सहकार्य करत आहे.


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें