ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

गुरुवार, 31 अगस्त 2023

सुप्रिया सुळे यांच्‍या भेटी नंतर माजी आमदार प्रदिप नाईक एक्‍शन मोड वर,कार्यकर्ते व पदाधीकारी यांच्‍या भेटी गाठी जोरात.



सुप्रिया सुळे यांच्‍या भेटी नंतर माजी आमदार प्रदिप नाईक एक्‍शन मोड वर,कार्यकर्ते व पदाधीकारी यांच्‍या भेटी गाठी जोरात.

किनवट विषेश प्रतिनीधी  

राज्‍यात घडत असलेल्‍या परिस्‍तिथी नंतर माजि आमदार प्रदिप नाईक यांनी  मुंबई येथे सुप्रिया सुळे यांची समक्ष भेट घेवुन आपल्‍या मतदार संघात जोमाने कामाला लागल्‍याने पदाधीकारी व कार्यकर्त्‍यात उत्‍साह वाढत चालला आहे. २००४ ते २०१९ या पंदरा वर्षात ज्‍या प्रकारे माजी आमदार प्रदिप नाईक यांनी कामें केली आहेत त्‍याचा विसर किनवट मतदार संघातील जनतेला पडला असावा असा विरोधकांचा समज आहे. माञ ज्‍या प्रकारे प्रदिप नाईक हे अॅक्‍शन मोड वर येताच आपल्‍या मतदार संघात एक बुथ २० युथ बांधनीला वेग आला असुन आगामी निवडणुकीच्‍या पार्शवभुमीवर यर्वच पक्ष कामाला लागले असले तरी किनवट माहुर विधानसभा मतदार संघा मध्‍ये सर्वच सरदारांनी गड राखत बुथ बांधीणीला सुरवात केली आहे.

किनवट मतदार संघात २०२४ मध्‍ये होवु घातलेल्‍या निवडणुकीत राष्‍ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा कमबॅक होणार हे विरोधकांन सह सर्वांनाच धास्‍ती आहे. या मतदार संघातील जनता हे प्रदिप नाईक यांच्‍या भेटी साठी त्‍यांच्‍या चुली पर्यंत जावुन भेटायचे याला आज ही विसरत नाही यात काहींच शंका नाही. म्‍हणुन माजी आमदार प्रदिप नाईक यांची जनता व कार्यकत्‍यांशी घट्ट नाळ जुळलेल्‍या नाते संबधाची प्रचीती पहावयास मिळत आहे.

     किनवट माहुर विधान सभा मतदारसंघात सलग १५ वर्षे  हायट्रीक करणारे प्रदिप नाईक यांची २०१९ मध्‍ये अंर्तगत असंतोष व आपन मागील १५ वर्षा पासुन ज्‍या प्रकारे निवडुन आलो त्‍याच प्रकारे आपल्‍याला जनता निवडुन देईलच या आत्‍म विश्‍वासात त्‍यांचा घात झाला व ते आमदार चे माजी आमदार झाले. माञ या पाच वर्षात ज्‍या प्रकारे कार्यकर्तयांचा हिरमोळ झाला व सत्‍तेत नसल्‍याने आपल्‍याला किती यातना सोसाव्‍या लागतात हे लक्षात येवुन चुकले हे माञ कडु सत्‍य आहे. चुक लक्षात आल्‍याने राष्‍ट्रवादी पक्षातील सदस्‍या पासुन ते कार्यकर्त्‍या पर्यंत सर्वांनी पुन्‍हा आपला गड परत मिळवण्‍या साठी कामाला लागल्‍याचे चिञ किनवट मतदार संघात दिसुन येत आहे.

     पराभवा नंतर ही प्रदिप नाईक हे जन संर्पकातच आहेत, त्‍यामुळे जन सामान्‍यांना आज ही ते आपले नेते वाटतात या साठीच आज सुद्धा प्रदीप नाईक आपल्‍या कामाला गती देत आहेत या मुळे दुरावलेला कार्यकर्ता देखील त्‍यांच्‍या अधीक जवळ आला आहे. अश्‍यात एक बुथ २० युथ या कार्यक्रमाला पक्षाने सुरवात केली आहे. प्रदिप नाईक यांच्‍या मार्गदर्शनात तयार झालेले कर्यकर्ते आपल्‍या नेत्‍याच्‍या प्रतयक्ष उपस्तिीथीची वाट न पाहता कामाला लागले आहेत. त्‍यामुळे संबध मतदार संघ राष्‍ट्रवादीमय दिसत आहे. त्‍यांचे कार्यकर्ते शिष्‍टेचे पालन करत मोठ्रया प्रमाणावर बुथ कमीट्या स्‍थापन करुन पुन्‍हा प्रदिप नाईक यांना माजी वरुन आजी वर आनण्‍यासाठी मोर्चे बांधनीला लागले आहेत. नाईकांची त्‍यांच्‍या कार्यकर्त्‍या बाबत असणारी अपुलकी व नाते संबध यातुन खरोखर नेता म्‍हणुन जनता प्रदिप नाईक यांच्‍या कडे मोठ्या आशेने पहात आहेत हे माञ तेवढेच खरे.

प्रदिप नाईक यांच्‍या सलग १५ वर्षाच्‍या कार्यकाळाचा ईतीहास पाहुन शरदचंद्र पवार,सुप्रीया सुळे सह सर्वंच जेस्‍टनेते नाईक यांच्‍यावर खुश आहेत व ते सतत सर्पकात आहेत व नाईक यांना कामाला लागा लोकसभे बरोबर विधान विधासभा लागण्‍याची शक्‍यता असल्‍याचे संकेत दिले आहेत आता नाईकांनी सुद्धा सर्वच मतदारसंघ पिंजुन काढायला सुरवात केली असल्‍याचे चिञ स्‍पष्‍ट दिसुन येत आहे....                    


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें