ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

सोमवार, 5 सितंबर 2022

जि.प.शिक्षकांची महिन्‍यात १,४०१ पदे वाढली. सांगा खरे काय ? माहिती अधकारात दिली १९ हजार ४५२ रिक्‍त पदे.

नांदेड प्रतीनीधी/ रशीद फाजलानी

राज्‍यभरात जिल्‍हा परिषदांमध्‍ये कार्यरत शिक्षकांच्‍या नुकत्‍याच आंतरजिल्‍हा बदल्‍या पार पडल्‍या.त्‍यासाठी शिक्षकांचे जिल्‍हानिहाय रिक्‍त पदांचे रोस्‍टर जाहीर करण्‍यात आले होते.या रोस्‍टरनुसार राज्‍यात मराठी माध्‍यमांची १६ हजार ७४८ पदे तर उर्दु माध्‍यमांची १ हजार ३०१ पदे रिक्‍त दाखविण्‍यात आली होती. अशी राज्‍य भरात एकुण १८ हजार ४९ पदे रिक्‍त होती. माञ एकाच महीण्‍यात रिक्‍त पदांची संख्‍या १ हजार ४०१ ने वाढल्‍याचे धक्‍कादायक वास्‍तव माहीती अधीकारातुन पुढे आला आहे. 

     पुने येथील प्रदीप दराडे यांनी माहीती अधीकार अधिनियमानुसार माहीती मांगवीली होती. त्‍यानुसार आता राज्‍यात जि.प.शिक्षकांची १९ हजार ४५२ पदे रिक्‍त असल्‍याची माहीती प्राथमीक शिक्षण संचालनालय, पुने यांनी दिली आहे.

३० विद्धा‍र्थ्‍यामागे एक शिक्षक या पीटीआर नुसार शिक्षकांच्‍या नेमनुकांना मंजुरी दिली जाते. सध्‍या याच पटसंख्‍येच्‍या आधरावर मंजुर २ लाख १९ हजार ४२८ पदापैकी १ लाख ९९ हजार ९७६ पदांवर जि.प.शिक्षक कार्यरत असुन, तब्‍बल १९ हजार ४५२ पदे अध्‍यापही रिक्‍त आहेत. तर यात महापालीका नगर परिषद शाळा, छावणी शाळा येथील रिक्‍त पदांची संख्‍या ३१ हजार ४७२ एवढी होते. खासगी अनुदानित शाळा, अनुदानित आश्रम शाळा, शासकीय आश्रम शाळा येथील रिक्‍त पदे ही वेगळीच आहेत.

     २०११ पासुन शिक्षक भरती नाही त्‍यामुळे राज्‍यातील जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांमधील शिक्षकांची रिक्‍त पदे आंतरजिल्‍हा बदलिच्‍या निमित्‍ताने जाहीर केलेल्‍या रोस्‍टर नुसार १८ हजारावर होती. हि रिक्‍त पदे भरण्‍याची मांगणी राज्‍य सरकार कडे ट्रायबल फोरम महाराष्‍ट्र या संघटनेने काही दिवसा पुर्वीच केली आहे, हे माञ विषेष.

ग्रामीण व शहरी भागात जिल्‍हा परिषदांच्‍या शाळामध्‍ये गरीबांची मुले,मुली शिक्षण घेत आहेत. विद्धार्थ्‍यांची समस्‍या बी.एड.डी.एड. बेरोजगार युवकांची समस्‍या लक्षात घेवुन आणि जिल्‍हा परिषदांच्‍या शाळा वाचाव्‍या म्‍हणुन रिक्‍त पदे भरण्‍याची मांगणी निवृत्‍त  उपायुक्‍त ,राज्‍य सचीव,ट्राबल फोरम चे रमेश मावस्‍कर यांनी केली आहे.

प्राथमिक शिक्षकांच्‍या रिक्‍त पदावर एक नजर

जिल्‍हा परिषद मंजुर पदे २१९४२८ तर कार्यरत १९९९७६ रिक्‍त पदे १९४५२

महापालिका शाळा  मंजुर पदे १९९६० कार्यरत ८८६२ तर रिक्‍त पदे ११०९८

नगर परिषद शाळा मंजुर पदे ६०३७ कार्यरत ५१३६ रिक्‍त पदे ९०१

छावणी शाळा मंजुर पदे १६६ कार्यरत १४५ आणी रिक्‍त पदे २१ येवढी आहेत.

एकण मंजुर पदे  २,४५५९१ कार्यरत २,१४११९ तर रिक्‍त पदे ३१,४७२ येवढी आहेत.

राज्‍य भरात शिक्षण क्षेञात येवढ्या मोठ्या भोंगळ कारभारावर व शिक्षणाचा दर्जा उंचावण्‍यासाठी शालेय शिक्षणमंञी दिपक केसरकर हे लक्ष देतील काय ? या कडे राज्‍याच्‍या शिक्षण प्रेमीचे लक्ष लागुन आहे. 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें