सारखनी प्रतीनीधी रशीद फाजलानी.
सारखनी येथील ग्रामपंचायतच्या सरपंच वनमाला ताई तोडसाम,ग्रामसेवक एच.एम. वाडेकर व येथील सर्व ग्राम पंचायत सदस्यांच्या सहकार्याने नविन ईमारतीचे बांधकाम करण्यात आले. या ईमारतीच्या कामा नंतर दि. १३ ऑगस्ट रोजी नांदेडचे जिल्हाधीकारी डॉ.विपीन ईटनकर यांच्या हस्ते नविन ईमारतीचे उदघाटन करण्यात आले. या वेळी आमदार भीमराव केराम, सहाय्यक जिल्हाधीकारी किर्ती किरन एच. पुजार, तहसीलदार डॉ. मृनाल जाधव,सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके, ग्रामसेवक एच.एम.वाडेकर, पानी पुरवठा विभागाचे अधीकारी व गावातील अनेक मान्यवर उपस्तिथ होते.
सर्व प्रथम कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तर अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले या वेळी सारखनी येथील आर्थीक दुर्बल घटक शिष्यवृती (८ वी) परिक्षेत उतिर्ण झालेल्या विध्याथ्यांचे व नवोदय,स्कॅलरशीप (५ वी) यांच्या सह मार्गदशकांचे स्वागत जिल्हाधीकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला यश्यस्वी करण्या साठी सरपंच,उप सरपंच,ग्रामसेवक व सर्व गा्रम पंचायत सदस्यांन सह ग्रामस्थानी प्रयत्न केले तर सुञ संचालन सिद्धार्थ मुनेश्वर यांनी केले तर सारखनीच्या सरपंच वनमाला ताई तोडसाम यांनी आभार व्यक्त केले.




कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें